esakal | सामान्यांना मोठा झटका! गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढले, 3 महिन्यांत 200 रुपयांनी महाग

बोलून बातमी शोधा

lpg gas cyllinder 1.jpg}

या महिन्यातील गॅस सिलिंडरच्या किंमतीत ही तिसऱ्यांदा वाढ झाली आहे.

सामान्यांना मोठा झटका! गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढले, 3 महिन्यांत 200 रुपयांनी महाग
sakal_logo
By
इ सकाळ ऑनलाइन

नवी दिल्ली- सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. त्यामुळे सबसिडी नसलेला 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 769 रुपयांनी वाढून 794 रुपये झाली आहे. वाढलेले दर आजपासून (दि.25) लागू झाले आहेत. या महिन्यातील गॅस सिलिंडरच्या किंमतीत ही तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या दरात आज 25 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. 

फेब्रुवारीमध्ये तिसऱ्यांदा महाग झाला सिलिंडर
सरकारने 4 फेब्रुवारीला एलपीजीच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आणि आता ही तिसऱ्यांदा दरवाढ झाली असून त्यात आणखी 25 रुपयांची भर पडली आहे. 

हेही वाचा- शेअरमध्ये गुंतवणूक कशी कराल?

सिलिंडरच्या दरात तीन महिन्यात 200 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. एक डिसेंबर रोजी सिलिंडर 594 रुपयावरुन 644 रुपये झाला होता. 1 जानेवारीला पुन्हा एकदा 50 रुपयांनी यात वाढ झाली. त्यानंतर 644 रुपयांचा सिलिंडर 694 रुपये झाला. 4 फेब्रुवारीला झालेल्या दरवाढीनंतर सिलिंडरची किंमत 644 रुपयांवरुन 719 रुपये झाला. 15 फेब्रुवारीला 719 रुपयांवरुन 769 रुपये झाला आणि 25 फेब्रुवारीला 25 रुपये दर वाढवल्याने त्याची किंमत 769 रुपयांवरुन 794 इतकी झाली आहे. 

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीचे दर बदलतात. परंतु, यावेळी 1 फेब्रुवारीला फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 190 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर दिल्लीत 19 किलोच्या सिलिंडरचा दर 1533 रुपये, कोलकाता येथे 1598.50 रुपये, मुंबईत 1482.50 रुपये आणि चेन्नईत 1649 रुपये झाला. 

हेही वाचा- सावधान! FASTag शी निगडीत या चुका करु नका, नाहीतर बसेल मोठा भुर्दंड

देशात एलपीजीचे सुमारे 28.9 कोटी ग्राहक आहेत. जानेवारीत एलपीजीच्या दरात कोणतीच वाढ झाली नव्हती. परंतु, डिसेंबरमध्ये दोन वेळा दर वाढल्यामुळे दिल्लीत एलपीजीचे दर 100 रुपयांनी वाढले होते. तर फेब्रुवारी 2021 मध्ये दिल्लीकरांना 50 रुपयांचा दणका बसला आहे.