Gold-Silver Price: दिवाळीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर

आजही सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली.
gold silver price
gold silver priceesakal

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली तर आजही सोने चांदीतही घसरण दिसून आली.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,930 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 595 रुपये आहे. (gold silver price update 11 october 2022)

gold silver price
Gold Silver Price : सोन्याचे दर उतरले! जाणून घ्या नवे दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 52,420 रुपये

  • दिल्ली - 52,100 रुपये

  • हैदराबाद - 51,930 रुपये

  • कोलकत्ता - 51,930रुपये

  • लखनऊ - 52,100 रुपये

  • मुंबई - 51,930 रुपये

  • नागपूर - 51,960 रुपये

  • पुणे - 51,960 रुपये

gold silver price
Gold Price: दसऱ्याच्या दिवशी सोनं महागलं! जाणून घ्या नवे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

gold silver price
Gold-Silver Price: सोन्याच्या दरात तेजी सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com