Gold Rate : खरेदीकरांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold

Gold Rate : खरेदीकरांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात लक्षणीय तेजी दिसून आली होती तर या आठवड्यात मात्र सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली तर आजही सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,800 तर 24 कॅरेट साठी 54,330 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 690 रुपये आहे. (gold silver price update 13 December 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 55,040 रुपये

  • दिल्ली - 54,490 रुपये

  • हैदराबाद - 54,330 रुपये

  • कोलकत्ता - 54,330 रुपये

  • लखनऊ -54,490 रुपये

  • मुंबई - 54,330 रुपये

  • नागपूर - 54,330 रुपये

  • पुणे - 54,330 रुपये

हेही वाचा: Gold Silver Rate : सोने चांदी तेजीत! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हेही वाचा: Gold Rate : हॉलीडेला सोनं महागलं! जाणून घ्या आजचे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.