Gold Silver Rate : सोने चांदी तेजीत! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

लग्नसराईचे दिवस असल्याने सोन्याचे दर आणखी महागण्याची शक्यता आहे.
Todays Gold and silver prices
Todays Gold and silver pricessakal

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. गुरुवारीही सोने महागल्याचे दिसले होते तर आज मात्र सोन्याचा भाव स्थिर असून चांदीच्या दरात वाढ दिसतेय. लग्नसराईचे दिवस असल्याने सोन्याचे दर आणखी महागण्याची शक्यता आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,500 तर 24 कॅरेट साठी 54,000 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 662 रुपये आहे. (gold silver price update 9 December 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 54,790 रुपये

  • दिल्ली - 54,150 रुपये

  • हैदराबाद - 54,000 रुपये

  • कोलकत्ता - 54,000 रुपये

  • लखनऊ -54,150 रुपये

  • मुंबई - 54,000 रुपये

  • नागपूर - 54,000 रुपये

  • पुणे - 54,000 रुपये

Todays Gold and silver prices
Gold Rate : खरेदीकरांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com