Gold Rate: सोन्याचा दर घसरला! जाणून घ्या आजचे नवे दर | Gold Silver Price Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold silver price

Gold Rate: सोन्याचा दर घसरला! जाणून घ्या आजचे नवे दर

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात तेजी घसरण दिसून येत आहे. मंगळवारी सोने चांदीच्या दरात कोणताही बदल दिसून आला नाही मात्र आज सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,800 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,150 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 627 रुपये आहे. (gold silver price update 16 November 2022

हेही वाचा: Gold Rate: हॉलीडेला सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 53,890 रुपये

  • दिल्ली - 52,300 रुपये

  • हैदराबाद - 52,150 रुपये

  • कोलकत्ता - 52,580 रुपये

  • लखनऊ - 52,300 रुपये

  • मुंबई - 52,150 रुपये

  • नागपूर - 52,180 रुपये

  • पुणे - 52,180 रुपये

हेही वाचा: Gold Rate: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सोनं स्वस्त! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा: Gold Rate: वीकेंडला सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.