Gold Rate : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे नवे दर

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीचे दर कमी जास्त होत आहेत.
Gold-Silver Update
Gold-Silver Updategoogle

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीचे दर कमी जास्त होत आहेत. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने चांदीचे दर स्थिर दिसून येत आहे. रविवारी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती तर चांदीचे दर स्थिर होते.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,010 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,290 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 577 रुपये आहे. (gold silver price update 24 october 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 51,720 रुपये

  • दिल्ली - 51,450 रुपये

  • हैदराबाद - 51,290 रुपये

  • कोलकत्ता - 50,780 रुपये

  • लखनऊ - 51,450 रुपये

  • मुंबई - 51,290 रुपये

  • नागपूर - 51,320 रुपये

  • पुणे - 51,310 रुपये

Gold-Silver Update
Gold Price: वसुबारसच्या दिवशी सोनं स्वस्त! जाणून घ्या नवे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Gold-Silver Update
Gold Rate: दिवाळीच्या तोंडावर सोने महागले! जाणून घ्या आजचे नवे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com