Gold Rate: वीकेंडला करा खरेदी! सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold silver rate

Gold Rate: वीकेंडला करा खरेदी! सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचे दर

गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. शुक्रवारी सोने चांदीच्या दरात लक्षणीय घसरण दिसून आली होती तर आजही सोन्याच्या भावात घसरण दिसून येत आहे तर चांदीचे दर मात्र स्थिर आहे.

आज सोने आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,090 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,280 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 600 रुपये आहे. (gold silver price update 5 November 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 50,450 रुपये

  • दिल्ली - 50,430 रुपये

  • हैदराबाद - 50,280 रुपये

  • कोलकत्ता - 50,280 रुपये

  • लखनऊ - 50,430 रुपये

  • मुंबई - 50,280 रुपये

  • नागपूर - 50,310 रुपये

  • पुणे - 50,310 रुपये

हेही वाचा: Gold Update : दोन महिन्यानंतर सोने घसरले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा: Gold-silver Price: सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.