Gold Rate : खरेदीकरांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold rate

Gold Rate : खरेदीकरांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर

गेल्या काही आठवड्यापासून सोने चांदीच्या दरात तेजीचे सत्र सुरू होते. मंगळवारी सुद्धा सोन्याच्या दरात तेजी होती मात्र आज या तेजीला ब्रेक लागला असून सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,300 तर 24 कॅरेट साठी 53,780 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 660 रुपये आहे. (gold silver price update 7 December 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 53,780 रुपये

  • दिल्ली - 53,930 रुपये

  • हैदराबाद - 53,780 रुपये

  • कोलकत्ता - 53,930 रुपये

  • लखनऊ -54,260 रुपये

  • मुंबई - 53,780 रुपये

  • नागपूर - 53,780 रुपये

  • पुणे - 54,780 रुपये

हेही वाचा: First Gold ATM : राहुल गांधींचा जोक नाही, खरंच इथे कार्ड टाका सोनं बाहेर येईल

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.