Gold-Silver Price: सोनं स्थिर तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

आज सोन्याच्या भाव स्थिर असून चांदीच्या दरात किंचित घसरण झाली आहे.
Today's Gold Silver Price Updates
Today's Gold Silver Price Updatesesakal

Gold-Silver Price Today: सोनं आणि चांदीच्या दरात चढउतार होत असतात. आज सोन्याच्या भाव स्थिर असून चांदीच्या दरात किंचित घसरण झाली आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर ४७,८०० रुपये आहे. कालही सोनं याच किमतीत विकलं जात होतं. तर २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला असून मुंबईत ते प्रतितोळा ५२,१४० विकलं जात आहे.

तर चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव प्रतिकिलो ६६,३०० रुपये प्रति किलो आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६६३ रुपये आहे. वरील दरांमध्ये GST इतर कर समाविष्ट नाहीत. या शुल्कांमुळे विविध ठिकाणी सोन्याच्या दरांमध्ये फरक आढळतो.

Today's Gold Silver Price Updates
Gold Silver Price: सोने-चांदीचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आजचे दर

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Today's Gold Silver Price Updates
Gold Silver Price: सोनं आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com