Gold Silver Rate: सोने-चांदी खरेदी आज स्वस्त की महाग ? जाणून घ्या आजचे दर

आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आजचे दर जाणून घ्यायला हवेत.
india gold
india goldSakal

Gold Silver Rate Today: देशातील सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आजचे दर जाणून घ्यायला हवेत. आज शनिवारी 26 मार्च रोजी देशात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.

सोन्याचा आजचा दर-

आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,590 रुपये आहे. काल 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,310 रुपये होती. म्हणजेच सोन्याच्या दरात कालच्या दिवसाच्या तुलनेत 280 रुपयांनी वाढ झाली आहे.

india gold
Gold Sliver Rate : सोने-चांदी महागलं, जाणून घ्या आजचा दर

22 कॅरेट सोन्याचा दर-

त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याचा दर 48200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कालच्या दिवसाच्या तुलनेत आज सोने 250 रुपयांनी महागले आहे. शुक्रवारी सोन्याची किंमत प्रतितोळा 47950 रुपये आहे.

चांदीही महागली-

याशिवाय कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात 1500 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. शनिवारी एक किलो चांदीचा भाव 70000 रुपये झाला आहे, तर कालच्या दिवशी हा दर 68500 रुपये प्रति किलो होता.

india gold
Gold-Silver Rate: सोनं झालं स्वस्त! एका तोळ्याचा काय आहे भाव जाणून घ्या

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

india gold
२४ कॅरेटचा Gold Tea पिणाऱ्या सना खानसोबतच होतेय चहाच्या किंमतीची चर्चा

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com