
बुधवारी सोन्याच्या दरांमध्ये झालेल्या वाढीनंतर गुरुवारी सोन्याचे दर घसरले
नवी दिल्ली- बुधवारी सोन्याच्या दरांमध्ये झालेल्या वाढीनंतर गुरुवारी सोन्याचे दर घसरले. 22-कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 120 रुपयांनी घसरुन 48,460 रुपयांवर स्थिर झाले. 24 कॅरेट सोने 120 रुपयांनी घसरुन 49,460 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दिल्लीतील सोन्याचे दर जैसे-थे राहिले. दिल्लीत उच्च दर्जाच्या सोन्याची किंमत 52,750 रुपये प्रति ग्रॅम आहे.
चेन्नईमध्येही सोन्याचे दर घसरले आहेत. 10 ग्रॅम सोन्यामागे किंमत 180 रुपये कमी झाली आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,620 प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचे दरही कमी झाले असून 50,900 रुपयांवर तो स्थिर झाला आहे. कोलकातामध्येही सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शहरात 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,690 रुपये प्रती ग्रॅम आहे.
PM मोदींच्या जवळच्या अधिकाऱ्याने राजीनामा देऊन केला भाजप प्रवेश
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 30 दिवसांपासून सोने चांगली कामगिरी करत आहे. गेल्या 30 दिवसात सोन्याच्या किंमतीमध्ये 0.71 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण, गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,839 अमेरिकी डॉलर झाली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरामध्ये वाढ झाली आहे.10 ग्रॅम चांदीमागे 5 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत 1 किलो चांदीची किंमत 66,300 रुपये झाली, तर मुंबई, कोलकाता, चेन्नईमध्ये चांदीची किंमत 70,300 च्या जवळपास आहे.
"आरोप गंभीर, पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल" पवारांची पहिली...
2020 मध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. 2019 मध्येही सोन्याचे भाव वाढले होते आणि आता 2021 मध्येही सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजारांच्या आसपास आहे, पण 2021 मध्ये सोन्याला भाव येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार 2021 वर्ष सोन्यासाठी चांगले राहिल. यावर्षी सोन्याची किंमत 63,000 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत जाऊ शकते.