गुगल लवकरच 'शेअरचॅट'मध्ये गुंतवणूक करणार, जाणून घ्या काय आहे करार

google may acquire sharechat
google may acquire sharechat

गुगल लवकरच भारतीय स्टार्टअप अॅप शेअरचॅट (Sharechat) मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. यासाठी गुगल आणि शेअरचॅटमध्येही याबाबत बोलणी सुरू आहेत. या प्रकरणाशी संबंधित दोन लोकांनी याबाबत माहिती दिली आहे. असे सांगितले जात आहे की, शेअरचॅट आणि गुगल यांच्यातील हा करार सुमारे $1.03 बिलियनमध्ये होऊ शकतो. गुगलने शेअरचॅटमध्ये गुंतवणूकीची प्रक्रिया सुरू केली असून येत्या काही दिवसांत गुगलकडून याबाबत काही महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. (google may acquire sharechat)

शेअरचॅटच्या मूळ कंपनीने अल्फाबेट इंकचे Google , मीडिया बेहेमथ टाईम्स ग्रुप आणि सिंगापूरच्या टेमासेक होल्डिंग्सकडून सुमारे $300 मिलीयन नवीन भांडवल उभारले आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मूल्य सुमारे $5 अब्ज आहे. या व्यवहारांबद्दल माहिती असलेल्या दोन व्यक्तींनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात करार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

असे मानले जाते की, शेअरचॅटचे संस्थापक या डील अंतर्गत स्वतःसाठी एक छोटासा भाग राखून ठेवू शकतात आणि बाकीचा Google डील अंतर्गत विकत घेईल. सप्टेंबरमध्येच ShareChat ने काही गुंतवणूकदारांकडून व्यवसायात $40 दशलक्ष गुंतवणूक केली होती. ShareChat ने गुंतवणूकदारांकडून एकूण $264 दशलक्ष उभे केले आहेत. या संबंधित लोकांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आधी ShareChat ची किंमत $650 दशलक्ष असण्याचा अंदाज होता. गुगलसोबत शेअरचॅट डील निश्चित झाल्यास सध्याचे गुंतवणूकदार शेअरचॅटमधून बाहेर पडतील.

गुगलने शेअरचॅटमध्ये खूप दिवसांपासून स्वारस्य दाखवल्याचेही वृत्त आहे. सप्टेंबरमध्येच, तो शेअरचॅटला प्रीमियम देण्याच्या विचारा होते, परंतु काही कारणास्तव त्यावेळी हा करार होऊ शकला नाही. आता गुगल आणि शेअरचॅटमधील डीलबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या डीलमध्ये आतापर्यंत सर्व काही ठीक चालले आहे. तथापि, गुगल किंवा शेअरचॅट या दोघांनीही या डीलबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

google may acquire sharechat
सिद्धू मुसेवाला कोण होता? जाणून घ्या त्याची वादग्रस्त कारकिर्द

अशा स्थितीत गुगल आणि शेअरचॅटच्या डीलची बातमी ऐकणाऱ्यांना या डीलचा गुगलला काय फायदा होणार असा विचार आहे. हा करार पूर्ण झाल्यास, Google ला ShareChat मुळे मोठो मार्केट मिळू शकते. ShareChat 15 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यात शॉर्ट फॉरमॅट स्वरूपातील व्हिडिओ आहेत आणि 160 मिलीयन सक्रिय वापरकर्ते देखील आहेत. Tiktok सारख्या चिनी अॅप्सवर बंदी घातल्याने शेअरचॅटला थेट फायदा झाला, ज्यामुळे शेअरचॅटच्या वापरकर्त्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली.

google may acquire sharechat
राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com