इन्फोसिसचा ‘बायबॅक’

इन्फोसिसच्या वार्षिक अहवालानुसार कंपनी वर्ष २०२० पासून पुढील पाच वर्षांत येणारी नक्त पैशाची आवक ८५ टक्क्यांपर्यंत भागधारकांना लाभांश
infosys
infosyssakal
Summary

इन्फोसिसच्या वार्षिक अहवालानुसार कंपनी वर्ष २०२० पासून पुढील पाच वर्षांत येणारी नक्त पैशाची आवक ८५ टक्क्यांपर्यंत भागधारकांना लाभांश

कंपनी कायद्याच्या कलम ६८ नुसार कोणत्याही कंपनीला आपले शेअर बाजारातून खरेदी करता येऊ शकतात. या शेअर खरेदीमागे अनेक कारणे असू शकतात. उदा. १) कंपनीकडे भरपूर पैसा पडून असणे. २) नव्या गुंतवणुकीला वाव नसणे. ३) लाभांश किंवा बोनस शेअरवरील कर वाचवण्यासाठी.

४) शेअरची संख्या कमी करून कंपनीचे मूल्यांकन वाढविण्यासाठी. ५) भरपूर पडलेल्या आपल्या शेअरची किंमत सावरण्यासाठी ६) कंपनीच्या मालकांना कंपनीवरील आपली पकड घट्ट करायची असते. थोडक्यात, अशा विविध कारणांसाठी शेअर बायबॅक केले जातात.

इन्फोसिसची शेअर खरेदी

इन्फोसिसच्या वार्षिक अहवालानुसार कंपनी वर्ष २०२० पासून पुढील पाच वर्षांत येणारी नक्त पैशाची आवक ८५ टक्क्यांपर्यंत भागधारकांना लाभांश, शेअर खरेदी किंवा खास लाभांशाच्या स्वरूपात वाटून टाकणार आहे.

त्यानुसार कंपनी यावर्षी आपले बाजारातील पाच कोटी दोन लाख ७० हजार २७० शेअर, ज्याची बाजारी किंमत सुमारे ९,३०० कोटी रुपये असेल, कंपनीच्या भागधारकांकडून विकत घेणार आहे. खरेदीची किंमत प्रती शेअर १८५० रुपयांपेक्षा जास्त राहणार नाही. ही किंमत जाहीर करण्याच्या दिवशी इन्फोसिसच्या शेअरची किंमत १४१९.७५ रुपये होती. याचाच अर्थ कंपनी ३० टक्के ज्यादा किंमत देऊन शेअर खरेदी करणार आहे.

मात्र, सर्वच शेअर १८५० रुपये भावाने घेतले जाणार नसून, दोन पद्धतीने खरेदी केले जाणार आहेत. १) टेंडर पद्धत आणि २) खुल्या मार्केटमधून ब्रोकरतर्फे. यामुळे बरेच शेअर १८५० रुपयांपेक्षा कमी भावाने घेण्याची शक्यता असल्याने एकूण खरेदी केलेल्या शेअरची संख्या वाढण्याची शक्यता आहे; मात्र एकूण रुपयांमधील किंमत ९३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. इन्फोसिसने बायबॅकबरोबरच प्रति शेअर १६.५० रुपयांचा लाभांशही जाहीर केला आहे.

शेअर खरेदीचा काळ : सात डिसेंबर २०२२ ते सहा जून २०२३. सहा महिन्यांत खरेदी पूर्ण व्हावयास पाहिजे. खरेदी केलेले शेअर पुढील सहा महिन्यांत विकता येणार नाहीत.

सारांश

कंपनीच्या आरमारातील ‘बायबॅक’ हे एक शस्त्र आहे. भागधारकांना खूश करण्याबरोबरच कंपनीची बाजारातील प्रतिमा सुधारण्यास याचा उपयोग होऊ शकतो. कारण विक्रीस काढलेल्या शेअरची संख्या कमी झाल्यामुळे भागभांडवलावरील परतावा (आरओई) आणि प्रति शेअर उत्पन्न (ईपीएस) सारख्या महत्त्वाच्या गुणोत्तरांत वाढ होत असते.

इतर काही कंपन्यांची शेअरखरेदी

पेटीएम : वर्ष २०२२ मध्ये ९,१८२ कोटी रुपयांचे शेअर खरेदी करणार आहे (शेअरची किंमत ७५ टक्के खाली आल्याने, किंमत सावरण्यासाठी!)

टीसीएस

नोव्हेंबर २०१७ : ११,००० कोटी रुपये

मे २०१७ : १६,००० कोटी रुपये

सप्टेंबर २०१८ : १६,००० कोटी रुपये

डिसेंबर २०२० : १६,००० कोटी रुपये

जानेवारी २०२२ : १८,००० कोटी रुपये

विप्रो

नोव्हेंबर २०१७ : ११,००० कोटी रुपये

(टीप : इन्फोसिसचा शेअर १४९८ रुपयांच्या (शुकव्रार, ता. २३ डिसेंबर रोजी बाजार बंद झाल्यावर नोंदलेला भाव) आसपास आहे; परंतु कंपनीने किती शेअर विकत घेतले आहेत, याची माहिती नसल्यामुळे शेअर या भावाच्या आसपास घुटमळतो आहे. जसजशी सहा जून २०२३ तारीख जवळ येऊ लागेल, तसतशी शेअरची किंमत वाढण्याची शक्यता आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com