महागाईची आकडेवारी जुलैपर्यंत जाहीर न करण्याचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

कोरोना महामारीमुळे आणि लॉकडाऊनमुळे आकडेवारी गोळा करण्यास अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

नवी दिल्ली,ता 11 (वृत्तसंस्था): भारत सरकारच्या सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाने महागाई आणि औद्योगिक उत्पादनाची (आयआयपी) आकडेवारी 31 जुलैपर्यंत जाहीर न करण्याच्या प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. कोरोना महामारीमुळे आणि लॉकडाऊनमुळे आकडेवारी गोळा करण्यास अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

...तर भारत 9.5 टक्के विकासदर गाठेल : फिच रेटिंग्स

सांख्यिकी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आकडेवारी गोळा करण्यासाठी असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो आहे. शिवाय आकडेवारी गोळा करणे आव्हानात्मक झाले आहे. अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आकडेवारी गोळा करण्यावर मर्यादा येत आहेत.  

कोरोनाच्या संकटातही भारताची परकीय गंगाजळी वाढतेय

परिणामी मार्यदित आकडेवारीच्या आधारे अर्थव्यवस्थेचे योग्य चित्र उभे राहणार नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. म्हणून केंद्र सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला असून केंद्र सरकार देखील विचाराधीन असल्याचे सांगण्यात येत आहे. 

USA Election: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका रद्द झाल्या तर काय होईल?

अर्थ आणि वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या मते, आकडेवारी जाहीर न केल्यास संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आकडेवारी जाहीर करण्यात यावी. नंतर त्यामध्ये सुधारणा करता येईल.साधारणतः प्रत्येक महिन्याच्या 12 तारखेला सरकार महागाई आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर करत असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government decided no announcement about inflation rate till 31 July