esakal | ...तर भारत 9.5 टक्के विकासदर गाठेल : फिच रेटिंग्स
sakal

बोलून बातमी शोधा

indian economy

दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.

...तर भारत 9.5 टक्के विकासदर गाठेल : फिच रेटिंग्स

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता.11 (वृत्तसंस्था): दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. भारताच्या विकासदरात मोठी घट चालू आर्थिक वर्षात अपेक्षित असल्याचे मत अनेक पत मानांकन संस्था वर्तवत आहेत. मात्र भारतीय अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षात उभारी घेत 9.5 टक्क्यांचा विकासदर नोंदवण्याची शक्यता असल्याचे मत "फिच रेटिंग्स'ने वर्तवले आहे. मात्र यासाठी भारताने आपल्या वित्तीय क्षेत्राचे आरोग्य सुधारण्याची आवश्यकताही "फिच'ने व्यक्त केली आहे. वित्तीय क्षेत्राच्या कामगिरीत होत असलेली घसरण रोखण्यात जर भारताला यश आले तर भारतीय अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षात 9.5 टक्क्यांचा विकासदर गाठू शकेल असे मत "फिच'ने व्यक्त केले आहे.

अमेरिकेत कोरोनाचा कहर! कोरोनाबाधितांची संख्या वाचून तुम्हालाली वाटेल भीती

कोविड-19 महामारीमुळे 2020-21 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेला मोठाच दणका बसला आहे. चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 5 टक्क्यांनी घटण्याची शक्यता "फिच रेटिंग्स'ने वर्तवली आहे. कोविड-19 मुळे भारताच्या विकासदराला मोठा फटका बसला आहे आणि याशिवाय भारत सरकारसमोर वाढत्या कर्जाचेही आव्हान आहे, असे "फिच'ने म्हटले आहे.

कोरोनाचं थैमान असताना आणखी एक संकट ओढावणार, UN ने दिला गंभीर इशारा

जागतिक संकट सरल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर चांगल्या पातळीवर जाऊ शकतो. त्यामुळे भारताचे पतमानांकन सुधारण्यासदेखील मदत होणार आहे. मात्र त्यासाठी भारताने आपल्या वित्तीय क्षेत्राच्या सक्षमतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत पुढे "फिच'ने मांडले आहे.

कोरोनाच्या संकटातही सुरक्षित 10 देशांची यादी जाहीर; जाणून घ्या भारत कितव्या स्थानी

याआधी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात, चलन तरलतेचा पुरवठा यासारखी पावले उचलली आहेत. भारत सरकारनेदेखील सद्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात सरकारवरील सर्वसाधारण कर्ज हे जीडीपीच्या 70 टक्के इतके होते. भारताचा सार्वजनिक कर्ज आणि "जीडीपी' यांचे गुणोत्तर 2020-21 मध्ये वाढून 84 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2019 मध्ये "फिच'ने भारताचे पतमानांकन "बीबीबी' केले होते.