कोरोनाच्या संकटातही भारताची परकीय गंगाजळी वाढतेय

india forex reserve
india forex reserve

मुंबई, ता.11 : भारताची परकी चलन गंगाजळी 500 अब्ज डॉलरजवळ पोचली आहे. येत्या आठवड्यात परकी गंगाजळी 500 अब्ज डॉलरचा जादुई आकडा गाठण्याची शक्यता आहे. मे महिन्यात (29 मेच्या आठवड्यात) परकी गंगाजळीमध्ये 12.4 अब्ज डॉलरची भर पडली असून 
ती आता 493. 48 अब्ज डॉलरवर पोचली आहे. भारतीय रुपयांमध्ये सुमारे 37.30 लाख कोटी रुपये मूल्याचा परकी चलन साठा आहे.

जगभरात कोरोनाच्या साथीने जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडल्या आहेत. तरीही भारताकडे परकी चलनाचा अखंड प्रवाह सुरू आहे. जपान आणि चीननंतर सर्वाधिक परकी गंगाजळी असलेला भारत जगातील तिसऱ्या क्रमांकांचा देश आहे. भारताने रशिया आणि दक्षिण कोरियाला मागे टाकले आहे. सध्या भारताचा परकी गंगाजळी 493 अब्ज डॉलरवर पोचली आहे. इतक्या निधीत भारत 17 महिने वस्तू आणि सेवांची आयात करू शकतो.

भारताच्या परकीय गंगाजळीत वाढ का?
जगभरात कोरोनामुळे व्यवसाय ठप्प आहेत. तरीही भारतीय परकी चलन साठ्यात वाढ होते आहे. कारण परकी गुंतवणूकदार शेअर बाजार आणि थेट परकी गुंतवणुकीच्या (एफडीआय) माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणवर गुंतवणूक करत आहेत.  परकी गुंतवणूकदारांनी 2.75 अब्ज डॉलर भारतीय शेअर बाजारात ओतले आहेत. वाढत्या परकी गुंतवणुकीमुळे  परकी चलन गंगाजळी लवकरच 500 अब्ज डॉलरचा टप्पा गाठेल. जिओमध्ये देखील नुकतीच परदेशी कंपन्यांनी नुकतीच 97 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.

वर्ष 1991 मध्ये होता फक्त 5.8 अब्ज डॉलर
वर्ष 1991 मध्ये भारताला सोने गहाण ठेवून कर्जाची परतफेड करावी लागली होती. त्यावेळी देशाकडे फक्त  5.8 अब्ज डॉलर परकी चलन साठा होता. आता त्यामध्ये 8400 टक्क्यांची वाढ झाली आहे.

परकी गंगाजळी म्हणजे काय?
"फॉरेक्‍स रिझर्व्ह' म्हणजे फॉरेक्‍स रिझर्व्ह म्हणजे परकी गंगाजळी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचं असते. प्रत्येक अर्थव्यवस्थेतल्या प्रमुख बॅंकेकडं हा परकी चलनसाठा असतो. परकी गंगाजळीमुळं देशातल्या प्रमुख बॅंकेला आणि पर्यायानं संपूर्ण अर्थव्यवस्थेला एक प्रकारचा आत्मविश्‍वास मिळतो, जागतिक स्तरावर एक प्रकारचा दबदबा निर्माण होतो त्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचे असते. देशकडील परकी चलनाचा साठा म्हणजे परकी गंगाजळी होय. प्रत्येक अर्थव्यवस्थेतल्या प्रमुख बॅंकेकडे हा परकी चलनसाठा असतो. परकी गंगाजळीमुळे देशातल्या प्रमुख बॅंकेला आणि पर्यायाने संपूर्ण अर्थव्यवस्थेला एक प्रकारचा आत्मविश्‍वास मिळतो. जागतिक स्तरावर एक प्रकारचा दबदबा निर्माण होतो.

परकी गंगाजळी का महत्त्वाची असते?
1- देशातल्या चलनाचा विनिमय दर अनुकूल ठेवणे शक्य
2- देशावरच्या आर्थिक संकटाची शक्‍यता कमी करणे
3- देशावर आर्थिक आरिष्ट आल्यास पैशांची तरलता अबाधित ठेवणे
4- परकी गुंतवणूकदारांचा आपल्या देशावरचा विश्वास वाढवणे
5- परकी कर्जाची परतफेड वेळेत करणे
6- देशातल्या योग्य औद्योगिक क्षेत्राची प्रगती करण्यासाठी पतपुरवठा करणे.
7- आर्थिक सुरक्षितता मिळवण्याबरोबर चांगला परतावा मिळविणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com