esakal | येस बँकेत गुंतवणूक करण्यास सरकारची 'एसबीआय'ला 'येस'?
sakal

बोलून बातमी शोधा

YES_SBI

सरकारच्या योजनेनुसार नव्याने उभारण्यात येणाऱ्या भागभांडवलापैकी एसबीआय 10 टक्के शेअर खरेदी करू शकते असे वृत्तात म्हटले आहे.

येस बँकेत गुंतवणूक करण्यास सरकारची 'एसबीआय'ला 'येस'?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेत गुंतवणूक करण्यासाठी केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) परवानगी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. एसबीआयच्या नेतृत्वात इतर गुंतवणूक संस्थांच्या साह्याने येस बँकेत भागभांडवल करण्याची सरकारची योजना असल्याचे समजते. ब्लूमबर्गने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, या वृत्तानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (बीएसई) येस बँकेला यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले असल्याचे बँकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निकषांचे पालन करण्यासाठी येस बँक मागील काही महिन्यांपासून प्रयत्नशील आहे. साधरणतः  दोन अब्ज डॉलर्स म्हणजेच 14 हजार कोटींचे भागभांडवल उभारण्याचा बँकेचा मानस आहे.

- पीएफबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

दरम्यान, मागील काही दिवसांपासून एसबीआय येस बँकेत गुंतवणूक करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तसेच भागभांडवलाच्या कारणास्तव येस बँकेला अपयशी होऊ दिले जाणार नाही, असे एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. थकीत कर्जाच्या प्रमाणात प्रोव्हिजन करण्यासाठी आणि रोखतेसाठी हे भांडवल वापरले जाणार आहे.

- कोणीही एनआरआय विकत घेऊ शकतो एअर इंडिया; केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वाची माहिती

सरकारच्या योजनेनुसार नव्याने उभारण्यात येणाऱ्या भागभांडवलापैकी एसबीआय 10 टक्के शेअर खरेदी करू शकते असे वृत्तात म्हटले आहे. तर इतर गुंतवणूकदार संस्थांची निवड करण्यासाठी सरकारने एसबीआयला सांगितले असल्याचे देखील ब्लूमबर्गच्या वृत्तात म्हटले आहे.

- बँकांबाबत अर्थमंत्री सीतारामन यांचा मोठा निर्णय; आता...