esakal | फिचकडून भारताचा विकासदर 4.9 टक्के राहण्याचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

growth rate increased by 4 point 9 percent says fitch

2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर किंचित सुधारत 5.4 टक्क्यांवर पोचेल असेही फिचने म्हटले आहे. तिसऱ्या तिमाहीत देशाचा विकासदर 4.7 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

फिचकडून भारताचा विकासदर 4.9 टक्के राहण्याचा अंदाज

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : फिच सोल्युशन्सने 2019-20 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 4.9 असण्याचा अंदाज वर्तवला आहे. देशांतर्गत मागणीतील घट आणि कोरोना विषाणूच्या फैलावामुळे उद्योगांना उत्पादनासाठी लागणाऱ्या सुट्या भागांसंदर्भात निर्माण झालेली अडचण यामुळे फिचने भारताच्या अंदाजित विकासदरात कपात केली आहे.

दिल्ली हिंसाचारावर पुन्हा बोलली सोनम; म्हणाली 'शांत राहणे शहाणपणाचे नाही!'

2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर किंचित सुधारत 5.4 टक्क्यांवर पोचेल असेही फिचने म्हटले आहे. तिसऱ्या तिमाहीत देशाचा विकासदर 4.7 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. निर्यातीतील घट आणि सरकारकडून होत असलेल्या भांडवली खर्चातील घसरण यामुळे विकासदर घटला आहे. आधीच एनबीएफसी क्षेत्रातील आर्थिक संकटामुळे पतपुरवठ्याच्या अडचणीचा सामना करणाऱ्या भारतीय उद्योगविश्वाला 2020-21 या आर्थिक वर्षासाठी सादर झालेल्या केंद्रिय अर्थसंकल्पातून कोणताही मोठा दिलासा मिळालेला नाही. त्याचाही विपरित परिणाम उद्योगविश्वावर होणार असल्याचे फिच म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वाहनकर्ज आणि गृहकर्जासाठी एनबीएफसी क्षेत्र ग्राहकांसाठी खूप महत्त्वाचे असते. मात्र हे क्षेत्र सध्या अडचणीत सापडले आहे. त्याबरोबरच चीनमधून होणाऱ्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चीनमधील औद्योगिक उत्पादन जवळपास ठप्प झाल्याचा परिणाम भारतीय उत्पादन क्षेत्रावरसुद्धा होणार आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या मध्यापासून अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा फिचने केली आहे.