esakal | दिल्ली हिंसाचारावर पुन्हा बोलली सोनम; म्हणाली 'शांत राहणे शहाणपणाचे नाही!'

बोलून बातमी शोधा

Sonam Kapoor tweets about silence and history }

आंदोलनानंतर काही दिवसांनी सोनमने पुन्हा एकदा ट्विटरवर आपली मतं मांडायला सुरवात केली आहे. ही मतं थेट सीएएवर भाष्य करणारी नसली तरी त्याच पार्श्वभूमीवर असल्याची चर्चा होत आहे. 

दिल्ली हिंसाचारावर पुन्हा बोलली सोनम; म्हणाली 'शांत राहणे शहाणपणाचे नाही!'
sakal_logo
By
वृत्तसंस्था

सीएए, एनआरसीविरोधात देशात वादंग पेटलेला असून, कलाकार मंडळी या आंदोलनात सक्रियपणे उतरलेली दिसतात. कधी आंदोलनात, तर कधी सोशल मीडियावर ही कलाकार मंडळी व्यक्त होत असतात. सोनम कपूरही या आंदोलनात सुरवातीपासून सीएएच्या विरोधात उभी आहे. अशातच आंदोलनानंतर काही दिवसांनी सोनमने पुन्हा एकदा ट्विटरवर आपली मतं मांडायला सुरवात केली आहे. ही मतं थेट सीएएवर भाष्य करणारी नसली तरी त्याच पार्श्वभूमीवर असल्याची चर्चा होत आहे. 

Sooryavanshi Trailer : 'आ रही है पोलिस' म्हणत सूर्यवंशी, सिंघम, सिंबाचा दंगा

सोनमने ट्विट केलंय की, 'शांत बसणे हे नेहमी शहाणपणाचे नसते, परिस्थितीची पूर्ण जाण नसल्याने ते भ्याडपणाचेही असते आणि म्हणूनच ते अत्यंत विध्वंसक असते.' असे एका ट्विटमध्ये म्हणले आहे, तर दुसऱ्या ट्विटमध्ये ती सांगते की, 'इतिहासाच्या योग्य बाजूने उभे राहा, नाहीतर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल.' असे ती म्हणते. यात थेट सीएएला विरोध केला नसला तरी त्यासंदर्भातच ही मतं मांडली आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अक्षय कुमार वसवणार ट्रान्सजेंडर्ससाठी घरं!

सोनमने सुरवातीपासूनच सरकारच्या या भूमिकेला विरोध दर्शविला आहे.