esakal | एचडीएफसीचा नफा घटून २,२३३ कोटींवर;२१ रुपये प्रति शेअरचा लाभांश जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

hdfc

मागील वर्षी मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीने २,८६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. एचडीएफसीच्या संचालक मंडळाने २१ रुपये प्रति शेअरचा लाभांशाला मंजूरी दिली आहे.

एचडीएफसीचा नफा घटून २,२३३ कोटींवर;२१ रुपये प्रति शेअरचा लाभांश जाहीर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

एचडीएफसी या देशातील गृहकर्ज वितरणाच्या क्षेत्रातील देशातील आघाडीच्या कंपनीला ३१ मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत २,२३३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीशी तुलना करता एचडीएफसीच्या नफ्यात घट झाली आहे. मागील वर्षी मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीने २,८६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. एचडीएफसीच्या संचालक मंडळाने २१ रुपये प्रति शेअरचा लाभांशाला मंजूरी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

चौथ्या तिमाहीत एचडीएफसीने १,२७४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात कोरोनामुळे संकटाचा सामना करण्यासाठीच्या तरतूदीचाही समावेश आहे. मागील वर्षी याच कालावधीत एचडीएफसीने ३९८ कोटी रुपयांची तरतूद केली होती. 

३१ मार्च २०२० अखेर एचडीएफसीचे एकूण थकित कर्ज १.९९ टक्के इतके आहे. मार्चअखेर एचडीएफसीची एकूण तरतूद १०,९८८ कोटी रुपये इतकी आहे. 

* एचडीएफसीला मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत २,२३३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा
* एचडीएफसीच्या संचालक मंडळाकडून २१ रुपये प्रति शेअरचा लाभांशाला मंजूरी
* एचडीएफसीचे निव्वळ व्याजातून मिळणारे उत्पन्न ३,५६४ कोटी रुपये
* एचडीएफसीचे पुरेशा भांडवलाच्या उपलब्धतेचे प्रमाण (कॅपिटल अॅडेक्वसी रेशो) १७.७ टक्के

आर्थिक नियोजन कसे कराल?

मार्चअखेर एचडीएफसीचे निव्वळ व्याजातून मिळणारे उत्पन्न ३,५६४ कोटी रुपये इतके आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत एचडीएफसीला ३,१३९ कोटी रुपयांचे उत्पन्न निव्वळ व्याजातून मिळाले होते. 

एचडीएफसीचे पुरेशा भांडवलाच्या उपलब्धतेचे प्रमाण (कॅपिटल अॅडेक्वसी रेशो) १७.७ टक्के इतके आहे. यातील टिअर-१ भांडवल १६.६ टक्के आणि टिअर-२ भांडवल १.१ टक्के इतके आहे. लॉकडाऊनमुळे एप्रिल आणि मे महिन्यात कार्यालये बंद असल्यामुळे वैयक्तिक कर्ज वितरणावर परिणाम झाला आहे. कर्ज वितरणाची परवानगी आणि कर्जवितरण सेवांवर लॉकडाऊनमुळे परिणाम झाला आहे.

कोरोना काळात पॉलिसीचा प्रीमियम चुकवू नका रे...! 

loading image