'मुडीज' ने २२ वर्षांत पहिल्यांदा घटवले भारताचे पतमानांकन

पीटीआय
Tuesday, 2 June 2020

जागतिक पतमानांकन एजन्सी 'मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस'ने भारताच्या पतमानांकनात घट केली आहे. मुडीजने भारताच्या परकी चलन आणि स्थानिक चलनाच्या दीर्घकालीन पतमानांकनात घट करून ती 'बीएए२' वरून 'बीएए३' वर आणली आहे. सध्याच्या आर्थिक संकटामुळे घसरलेला आर्थिक वृद्धीदर, सरकारच्या सर्वसाधारण वित्तीय स्थितीतील घसरण, वित्तीय क्षेत्रातील अनिश्चितता आणि त्यावर योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात भारतातील धोरणात्मक संस्थांसंदर्भात प्रश्न उभे केले जातील अशी शक्यता मुडीजने व्यक्त केली आहे.

जागतिक पतमानांकन एजन्सी 'मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस'ने भारताच्या पतमानांकनात घट केली आहे. मुडीजने भारताच्या परकी चलन आणि स्थानिक चलनाच्या दीर्घकालीन पतमानांकनात घट करून ती 'बीएए२' वरून 'बीएए३' वर आणली आहे. सध्याच्या आर्थिक संकटामुळे घसरलेला आर्थिक वृद्धीदर, सरकारच्या सर्वसाधारण वित्तीय स्थितीतील घसरण, वित्तीय क्षेत्रातील अनिश्चितता आणि त्यावर योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात भारतातील धोरणात्मक संस्थांसंदर्भात प्रश्न उभे केले जातील अशी शक्यता मुडीजने व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

२२ वर्षांनंतर पहिल्यांदा मुडीने भारताचे पतमानांकन घटवले आहे. याआधी १९ जून १९९८मध्ये भारताने अणू चाचण्याघेतल्यानंतर मुडीजने देशाच्या पतमानांकनात घट केली होती.

'दीर्घकालात आर्थिक वृद्धीदराशी निगडीत धोक्यांसंदर्भात उपाययोजना,देशाच्या सर्वसाधारण वित्तीय स्थितीतील घसरण, वित्तीय क्षेत्रातील अस्थिरता यासंदर्भात भारताच्या धोरणात्मक संस्थावर प्रश्न उभे केले जाऊ शकतील या पार्श्वभूमीवर मुडीजने भारताच्या पतमानांकनात घट केली आहे', असे मुडीजकडून सांगण्यात आले आहे. 

शेअर बाजारातील तेजी कायम

मुडीजने भारताच्या स्थानिक चलनाच्या पतमानांकनातदेखील घट करून ते 'बीएए२' वरून 'बीएए३' वर आणले आहे. तर अल्पकालीन स्थानिक चलनाचे पतमानांकनसुद्धा घटवून मुडीजने 'पी-२' वरून 'पी-३' वर आणले आहे. अर्थव्यवस्थेतील, वित्तीय व्यवस्थेतील घसरण आणि जोखीम यांचा देशाच्या वित्तीय क्षमतेत मोठी आणि दीर्घकालीन घट होण्याच्या शक्यतेचा परिणाम मुडीजच्या पतमानांकनावर झाला आहे.

देशातील वीजेच्या खपात १४ टक्क्यांची घट;  मे महिन्यात १०३.०२ अब्ज युनिट्सचा वापर

याशिवाय मुडीजने भारताच्या दीर्घकालीन परकी चलन बॉंडचे पतमानांकन अनुक्रमे 'बीएए१' वरून घटवून 'बीएए२' वर  आणि बॅंक मुदतठेवीसंदर्भातील पतमानांकन 'बीएए२' वरून घटवून 'बीएए३ वर आणले आहे. भारताच्या क्षमतेच्या तुलनेत दीर्घकालात मंदावणारी आर्थिक वृद्धी, वाढते कर्ज, कर्ज उभारणी करण्यासंदर्भातील कमी होणारी ताकद आणि वित्तीय व्यवस्थेतील सातत्याने असलेली अनिश्चितता यासंदर्भात भारतसमोर मोठी आव्हाने आहेत आणि त्यावर उपाययोजना अंमलात आणण्याबाबत भारतातील धोरणात्मक संस्थांसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली असल्याचेही मत मुडीजने व्यक्त केले आहे.

रिलायन्स राईट्स इश्यूला जबरदस्त प्रतिसाद

याआधी नोव्हेंबर २०१७ मध्ये मुडीजने भारताचे पतमानांकन वाढवून 'बीबी२' वर नेले होते. भारतातील सुधारणांमुळे देशाच्या आर्थिक, संस्थात्मक आणि वित्तीय क्षमतेत वाढ होण्याच्या शक्यतेने मुडीजने तेव्हा ही पतमानांकनातील वाढ केली होती, असेही मुडीजने म्हटले आहे.

'ही' दरवाढ केल्याने सरकारच्या तिजोरीत किमान ५०० कोटींच्या अतिरिक्त महसुलाची भर

* पतमानांकनात घट करून ती 'बीएए२' वरून 'बीएए३' वर आणली
*आर्थिक संकटामुळे घसरलेला आर्थिक वृद्धीदर, सरकारच्या सर्वसाधारण वित्तीय स्थितीतील घसरण, वित्तीय क्षेत्रातील अनिश्चिततेचा परिणाम
*२२ वर्षांनंतर पहिल्यांदा मुडीने भारताचे पतमानांकन घटवले
* नोव्हेंबर २०१७ मध्ये मुडीजने भारताचे पतमानांकन वाढवून 'बीबी२' वर नेले होते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moodys downgrades Indias Ratings