esakal | लॉकडाउनमध्ये कंपनी ठरली 'हिरो'; विकल्या सर्वाधिक बाईक्स
sakal

बोलून बातमी शोधा

hero motocorp

एप्रिल महिन्यात लॉकडाऊन सक्तीने सुरू असल्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांना एका वाहनाचीदेखील विक्री करता आली नाही. याचा विपरित परिणाम वाहन उत्पादक कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे. मात्र त्यानंतर मे महिन्यात सरकारने वाहन उद्योगाला काही सूट दिल्यामुळे या क्षेत्राच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक दुचाकी विकणाऱ्या ऑटोमोबाईल कंपन्या कोणत्या ते पाहूया.

लॉकडाउनमध्ये कंपनी ठरली 'हिरो'; विकल्या सर्वाधिक बाईक्स

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लॉकडाऊनमध्ये हिरो मोटोकॉर्पने विकल्या सर्वाधिक दुचाकी 

कोविड-19 महामारीला अटकाव करण्यासाठी देशभर अनेक आठवडे लॉकडाऊन सुरू होता. या लॉकडाऊनचा भारतातील वाहन उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. विशेषत: एप्रिल महिना वाहन उद्योगासाठी फारच कठीण होता. एप्रिल महिन्यात लॉकडाऊन सक्तीने सुरू असल्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांना एका वाहनाचीदेखील विक्री करता आली नाही. याचा विपरित परिणाम वाहन उत्पादक कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे. मात्र त्यानंतर मे महिन्यात सरकारने वाहन उद्योगाला काही सूट दिल्यामुळे या क्षेत्राच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक दुचाकी विकणाऱ्या ऑटोमोबाईल कंपन्या कोणत्या ते पाहूया.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1. हिरो मोटोकॉर्प
लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक बाईक विकणाऱ्या कंपन्यांच्या यादीत हिरो मोटोकॉर्प नंबर वन ठरली आहे. हिरो मोटोकॉर्पने मे महिन्यात 1 लाखांपेक्षा अधिक दुचांकींची विक्री केली आहे. कंपनीने एकत्रितपणे 1,08,848 स्कुटर आणि बाईकचे वितरण शोरुमला केले आहे. नावाप्रमाणेच ही कंपनी लॉकडाऊनमध्ये हिरो ठरली आहे.

2. होडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडिया
दुसऱ्या क्रमांकावर होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडिया आहे. मे महिन्यात कंपनीने एकूण 54,000 वाहनांची विक्री केली आहे. अर्थात हिरो मोटोकॉर्प आणि होंडा यांच्यातील विक्रीच्या आकड्यात 50 टक्क्यांचे अंतर आहे. 

3. टीव्हीएस मोटर कंपनी
टीव्हीएसने तिसरा क्रमांक पटकावत मे महिन्यात एकूण 41,067 दुचाकींची विक्री केली आहे.

 म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका

4.  बजाज ऑटो
बजाज ऑटोने 39,286 दुचाकींची विक्री करत चौथा क्रमांक पटकावला आहे. 

5. रॉयल एनफिल्ड
देशातील लोकप्रिय ब्रँड असलेल्या रॉयल एनफिल्डने एकूण 18,429 मोटरसायकलींची विक्री केली आहे.

जून महिन्यापासून सरकारने लॉकडाऊन शिथिल करत कंपन्यांच्या कामकाजांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात वाहनांच्या विक्रीत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे.

स्टेट बँकेला 3,580 कोटींचा नफा; व्याजापोटी बँकेला 22 हजार  954 कोटीचे उत्पन्न