Share Market : 'हा' मेटल शेअर देणार तगडी कमाई

आदित्य बिर्ला ग्रुपच्या या कंपनीत ब्रोकरेज हाऊसेस गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत.
Hindalco Industries
Hindalco Industriesesakal
Summary

आदित्य बिर्ला ग्रुपच्या या कंपनीत ब्रोकरेज हाऊसेस गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत.

शेअर बाजारात (Share Market) सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेमध्ये, तुम्हाला बजेटपूर्वी पोर्टफोलिओमध्ये (Portfolio) मजबूत स्टॉकची निवड करायची असेल, तर तुम्ही हिंदाल्को इंडस्ट्रीजचा (Hindalco Ind.) विचार करू शकता. आदित्य बिर्ला ग्रुपच्या (Aditya Birla Group) या कंपनीत ब्रोकरेज हाऊसेस गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत.

Hindalco Industries
आदित्या बिर्ला सन लाईफचा IPO केव्हा येणार? जाणून घ्या, शेअरचा भाव?

हिंदाल्को फेव्हरेट का ?

डिसेंबरच्यापासून ॲल्युमिनियमच्या किमती 16 टक्क्यांनी वाढल्याचे मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. जास्तीच्या पुरवठ्यामुळे जागतिक बाजारपेठेत ॲल्युमिनियमच्या (Aluminum)किमती वाढल्या आहेत. त्यामुळे देशी कंपन्यांना चालना मिळत आहे. हिंदाल्कोसाठी हे सकारात्मक (Positive) आहे. हिंदाल्कोची उपकंपनी नोव्हेलिस $365 दशलक्षमध्ये अॅल्युमिनियम रिसायकलिंग सेंटर बनवणार असल्याचे समजत आहे. उत्तर अमेरिकन ऑटोमोटिव्ह ग्राहकांना सपोर्ट करणे आणि वार्षिक 1 दशलक्ष टनांपेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन कमी करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. नोव्हेलिसचे मूळ कंपनीसाठी EBITDA योगदान सुमारे 65 टक्के आहे.

हिंदाल्को इंडस्ट्रीज (Hindalco Ind.)हा बेस्ट पर्याय असल्याचे मोतीलाल ओसवाल म्हणत आहेत. कारण भारत (India) आणि नोव्हेलिस (Novelis) या दोन्हींकडून हिंदाल्कोला व्हॉल्यूम रिकव्हरी मिळणार आहे.

Hindalco Industries
शेअर बाजारात तेजी कायम, टॉप 10 शेअर्सवर ठेवा आज नजर

मजबूत रिटर्नची आशा

मोतीलाल ओसवाल यांनी त्यांच्या टॉप रिसर्च आयडियामध्ये हिंदाल्को इंडस्ट्रीजवर विश्वास ठेवला आहे. ब्रोकरेजने 589 रुपयांच्या टारगेटसह 'Buy' रेटिंग दिले आहे. 14 जानेवारी 2022 रोजी हिंदाल्को इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 506 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 83 रुपये किंवा सध्याच्या किमतीच्या जवळपास 16 टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या वर्षभराबद्दल बोलायचे झाले तर हा शेअर जवळपास 100 टक्के वाढला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. गेल्या पाच वर्षांच्या रिटर्न चार्टवर नजर टाकली तर तो 195 टक्के आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com