तुमच्या गृहकर्जाचा EMI 5000 रुपयांपर्यंत होऊ शकतो कमी!

होमलोनच्या ईएमआयमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Home
Homeesakal
Summary

होमलोनच्या ईएमआयमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

होमलोनच्या (Home Loan) ईएमआयमुळे (EMI) तुम्हीही त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमचे ईएमआयचे (EMI)ओझे कमी करण्यासाठी एक जबरदस्त ट्रिक्स आहे. पूर्वी बहुतांश बँका आठ-नऊ टक्के दराने गृहकर्ज (Home Loan)देत होत्या, पण आता बहुतांश बँका साधारण सात टक्के दराने गृहकर्ज देतात. यासोबतच अनेक बँका गृहकर्जावर जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काउंटही देत आहेत.

Home
आता EMI वर करता येणार हवाई प्रवास! काय आहे नवी योजना?

ईएमआय पाच हजार रुपयांपर्यंत कमी होईल

तुम्हीही गृहकर्ज घेतलं असेल आणि ईएमआयमुळे त्रस्त झालेला असाल तर ही ट्रिक्स जाणून घ्या. ज्यामुळे तुमचा ईएमआय जवळपास 5000 रुपयाने कमी होऊ शकतो. जर तुम्ही तुमचं जुनं गृहकर्ज दुसऱ्या बँकेत शिफ्ट केलंत तर तुमचा ईएमआयचा बोजा कमी होऊ शकतो. पण त्यासाठीही आधी प्लॅनिंग करावं लागतं.

जाणून घ्या ईएमआयमध्ये किती फरक असेल

बँक लोन ट्रान्स्फरमुळे तुमच्या ईएमआयवर किती फरक पडेल हे एका उदाहरणावरून समजून घेऊया. समजा तुम्ही 4 वर्षांपूर्वी 2017 मध्ये गृहकर्ज घेतलं असेल तर त्या बँकेच्या गृहकर्जावरील व्याजदर 9.25 टक्के होता. आता जर तुम्ही गृहकर्ज नव्या बँकेत शिफ्ट करून ते सात टक्क्यांवर नेलंत तर तुमच्या ईएमआयमध्ये किती फरक पडेल ते समजून घ्या...

Home
EMI च्या 10 टक्के गुंतवणूक; 20 वर्षांत गृहकर्जाचा खर्च वसूल

होम लोन शिफ्टपासून ईएमआयपर्यंतचा फरक

तुमची बँक

- वर्ष 2017

- कर्जाची रक्कम ३० लाख

- व्याजदर ९.२५ टक्के

- कर्जाची मुदत २० वर्षे

- ईएमआय २७,४७६

त्यानंतर आता समजा की 2021 मध्ये तुम्ही तुमचं गृहकर्ज नव्या बँकेत शिफ्ट केलं. त्यामुळे तुमच्या थकीत कर्जाची २६ लाख रुपयांची बचत होते.

नवीन बँकेची ईएमआय कॅल्युलेशन

- वर्ष 2020

- कर्जाची रक्कम २६ लाख

- व्याजदर ६.९० टक्के

- कर्जाची मुदत १६ वर्षे

- ईएमआय २२,४००

म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही तुमचं गृहकर्ज शिफ्ट केलंत तर तुमचा ईएमआय दर महिन्याला सुमारे 5000 रुपयांनी कमी होईल. आता जाणून घेऊया व्याज भरल्याने तुम्हाला कसा फायदा होईल?

- जर नवीन बँकेकडून गृहकर्जावरील एकूण व्याज 16 वर्षांच्या कालावधीत भरले गेले असेल तर - 17,00,820 रुपये

- जुन्या बँकेकडून गृहकर्जावर 16 वर्षांच्या कालावधीसाठी एकूण व्याज भरल्यास 23,90,488 रुपये

- व्याजातील अंदाजित बचत- २३,९०,४८८ - १७,००,८२० = ६.८९ लाख

- म्हणजेच उर्वरित कर्जाच्या कालावधीत कर्ज शिफ्ट करून तुम्ही 6.9 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com