या महिन्यात गॅस सिलिंडरवर किती सबसिडी मिळेल? घरबसल्या जाणून घ्या

सकाळ ऑनलाइन टीम
Wednesday, 17 February 2021

एलपीजी सबसिडी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांच्या वर आहे. त्यांना या सुविधेतून बाहेर ठेवण्यात आले आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकार नागरिकांना गॅस सिलिंडरच्या किंमतीवर दिलासा देण्यासाठी सबसिडीची सुविधा पुरवते. एलपीजी सबसिडी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांच्या वर आहे. त्यांना या सुविधेतून बाहेर ठेवण्यात आले आहे.  फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला सबसिडी मिळालेली आहे किंवा नाही ? चला तर जाणून घेऊयात तुम्ही तुमची सबसिडी कशी तपासू शकाल. 

असं तपासा इंडेन गॅसचे ऑनलाइन स्टेट्स
* सर्वात आधी तुम्हाला इंडेन गॅसच्या अधिकृत वेबसाइट https://bit.ly/3rU6Lol ला भेट द्यावी लागेल.

* तुम्हाला स्क्रिनवर सिलिंडरची एक इमेज दिसेल. 

* यावर क्लिक केल्यानंतर कम्पलेंट बॉक्स ओपन होईल. यामध्ये सबसिडी स्टेट्स लिहून प्रोसेस बटन दाबावे लागेल.

* आता सबसिडी रिलेटेड (PAHAL) बटनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर सब कॅटेगरीमध्ये काही नवीन ऑप्शन येतील. तिथे तुम्हाला सबसिडी नॉट रिसिव्हवर क्लिक करायचं आहे. 

* त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर नोंदवावा लागेल.

* मोबाइल नंबर लिंक नसेल तर आयडीचा एक ऑप्शन असेल. तिथे गॅस कनेक्शनचा आयडी एंटर करा.

हेही वाचा- Good News: आयटी सेक्टरमध्ये तब्बल 44 लाख रोजगाराची संधी, 95 टक्के सीईओंचे मत

मिळेल संपूर्ण माहिती
त्यानंतर स्क्रिनवर सबसिडीशी निगडीत सर्व माहिती समोर येईल. किती सबसिडी मिळाली आहे आणि किती पाठवली जात आहे. त्याचबरोबर तुम्ही कस्टमर केअरशी बोलून सबसिडीबद्दल माहिती मिळवू शकता. इंडेन कंपनीचा 1800-233-3555 हा कस्टमर केअर नंबर आहे. येथेही तुम्हाला मोबाइल नंबर किंवा कस्टमर आयडी मागितला जाईल. 

फेब्रुवारीमध्ये दोनवेळा महागला गॅस सिलिंडर
दरम्यान, फेब्रुवारीमध्ये सरकारी तेल कंपन्यांनी दोन वेळा सिलिंडरचे दर वाढवले आहेत. दि. 4 फेब्रुवारीला मेट्रो शहरांत इंडेन, एचपी आणि बिगर सबसिडी असणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to get information about gas cylinder subsidy know everything