
‘कोविड-१९’ च्या साथीचा परिणाम आता दरडोई उत्पन्नावरही होण्याचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात भारताच्या दरडोई उत्पन्नात ५.४ टक्क्यांची घट होण्याची शक्यता स्टेट बॅंकेच्या आर्थिक शाखेने व्यक्त केली आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) सर्वसाधारणपणे होणाऱ्या ३.८ टक्क्यांच्या घसरणीपेक्षा दरडोई उत्पन्नातील घट मोठी असेल.
नवी दिल्ली - ‘कोविड-१९’ च्या साथीचा परिणाम आता दरडोई उत्पन्नावरही होण्याचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात भारताच्या दरडोई उत्पन्नात ५.४ टक्क्यांची घट होण्याची शक्यता स्टेट बॅंकेच्या आर्थिक शाखेने व्यक्त केली आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) सर्वसाधारणपणे होणाऱ्या ३.८ टक्क्यांच्या घसरणीपेक्षा दरडोई उत्पन्नातील घट मोठी असेल.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिल्ली, चंडीगड आणि गुजरात या राज्यांत दरडोई उत्पन्नातील घट सर्वाधिक असेल. तेथे यावर्षी अनुक्रमे १५.४ टक्के, १३.९ टक्के आणि ११.६ टक्के घसरण होण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे, अरूणाचल प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांत दरडोई उत्पन्नातील घट सर्वांत कमी असेल.
पेमेंट्स ॲड सेटलमेंटअंतर्गत येत नाही; आरबीआयकडून न्यायालयासमोर स्पष्टोक्ती
देशपातळीवर विचार करता, चालू आर्थिक वर्षात म्हणजे २०२०-२१ मध्ये भारताच्या दरडोई उत्पन्नात ५.४ टक्क्यांची घट होऊन ते १.४३ लाख रुपयांवर येण्याची शक्यता आहे. गतवर्षी ते १.५२ लाख रुपये होते. ‘जीडीपी’तील सर्वसाधारण घसरणीपेक्षा (३.८ टक्के) ही घट जास्त राहण्याचा अंदाज आहे. स्टेट बॅंकेचे समूह मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्या कांती घोष यांनी ही बाब अहवालात नमूद केली आहे.
व्हिडिओकॉनच्या अध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
भारताच्या ‘जीडीपी’मध्ये या राज्यांचा वाटा जवळजवळ ४७ टक्के आहे. हा सर्व प्रामुख्याने शहरी आणि रेड झोनमधील परिसर असल्याने तेथे अधिक कडक स्वरुपात लॉकडाउनची अंमलबजावणी होत होती. बाजारपेठा, व्यापारी संकुले आणि मॉल बंद असल्याचा परिणाम तेथील उत्पन्नावर होत आहे. आता टप्प्याटप्प्याने तेथील बाजारपेठा सुरू होत असल्या तरी नेहमीपेक्षा ग्राहकांची संख्या ७०-८० टक्क्यांनी कमी असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.
यांना सर्वाधिक फटका
दिल्ली, चंडीगड आणि गुजरात
यांना कमी फटका
अरुणाचल प्रदेश, गोवा आणि मणिपूर