आगामी अर्थसंकल्पात सामान्यांनाही करता येणार सूचना; माहिती करून घ्या

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 4 December 2020

2021चा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाईल. आता सामान्यांनाही देशाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी योगदान देता येणार आहे.

नवी दिल्ली: 2021चा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाईल. आता सामान्यांनाही देशाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी योगदान देता येणार आहे. जर तुम्हाला यासाठी काही सूचना पाठवायची असेल तर तुम्ही त्या पाठवू शकणार आहात. केंद्र सरकार सध्या सर्वसामान्य जनतेकडून अर्थसंकल्पासाठी सूचना मागवत आहे.

2021-22 च्या अर्थसंकल्पात देशातील कोणीही त्यांच्या कल्पना किंवा सूचना पाठवून बजेटमध्ये सहभागी होऊ शकतो. सुचना पाठवायची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 होती, पण आता त्याची मुदत वाढवून 7 डिसेंबर 2020 केली आहे. देशातील नागरिकांना आता आगामी बजेटसाठी सूचना पाठवण्याची संधी मिळणार आहे.

Gold Silver Price: नोव्हेंबरमध्ये सोने 2500 रुपयांनी स्वस्त; माहिती करून घ्या आजचे दर

2021-22 च्या अर्थसंकल्पात लोकांचा अधिकाधिक सहभाग व्हावा यासाठी सरकारने MyGov प्लॅटफॉर्मची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे जर तुम्हाला बजेटसाठी काही सूचना करायच्या असतील तर यासाठी ऑनलाईन संपर्क साधावा लागेल. अर्थसंकल्पात अधिकाधिक सामान्य लोकांचा समावेश करण्यावर सरकारचा भर आहे. सामान्य जनतेच्या वतीने MyGov वर सूचना सादर केल्यानंतर भारत सरकारची संबंधित मंत्रालये किंवा विभागांकडून त्या सूचनांची किंवा कल्पनांची तपासणी केली जाणार आहे.

Signs of economic revival: क्रेडिट कार्डच्या मागणीत होतेय वाढ

सूचना कशा कराल?
तुम्हाला अर्थसंकल्प 2021 साठी सूचना देण्यासाठी  https://www.mygov.in/mygov-survey/inviting-suggestions-budget-2021-22/ या वेबसाइटवर जावं लागणार आहे. इथं गेल्यावर कमेंट बॉक्समध्ये सूचना सादर करता येणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला आधी ईमेल आयडी किंवा मोबाइल क्रमांकासह लॉग इन करणे आवश्यक आहे. तुमच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल नंतर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकाल आणि तूमच्या सूचना सरकारला कळवू शकाल. तुम्हाला फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन या सोशल मीडिया अकाउंट्सवरून लॉग इन करू शकतात.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to send suggestions or idea to government for budget 2021 22