
2019 च्या सप्टेंबरमधील तिमाहीत बँकेला 655 कोटींचा लाभ झाला होता.
नवी दिल्ली- कोरोना काळातही आयसीआयसीआय बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे. बँकेने जुलै-सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी जाहीर केली आहे. नेट प्रॉफिटमध्ये वार्षिक निव्वळ नफ्यात सहापट वाढ झाली आहे. सप्टेंबर तिमाहीमध्ये बँकेला 4251 कोटींचा फायदा झाला आहे. 2019 च्या सप्टेंबरमधील तिमाहीत बँकेला 655 कोटींचा लाभ झाला होता.
नेट इंटरेस्ट इन्कम 16 टक्क्यांनी उसळला
नेट इंट्रेस्ट इन्कम म्हणजे NII मध्येही 16 टक्के तेजी आली आहे. सप्टेंबर तिमाहीत एनआयआय 9366 कोटी होता. तर 2019 च्या सप्टेंबर तिमाहीत हा 8057 कोटी होता.
हेही वाचा- 'अल्लाउद्दीनचा दिवा' म्हणून घातला गंडा; डॉक्टरच्या तक्रारीनंतर पोलिसही बुचकळ्यात
एकूण ठेवीत 20 टक्क्यांची उसळी
बँकेच्या एकूण ठेवीतही वार्षिक आधारावर 20 टक्क्यांची तेजी आली आहे. 30 सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत बँकेचे एकूण डिपॉजिट 8 लाख 32 हजार 936 कोटी इतके होते. मुदत ठेवी 26 टक्क्यांची तेजी आली आहे. घरगुती कर्जात वार्षिक आधारावर 10 टक्क्यांची तर तिमाहीच्या आधारावर 4 टक्क्यांची तेजी आली आहे.
हेही वाचा- तेजस्वी यादव यांना 'कॅबिनेट'चे स्पेलिंगही सांगता नाही, केंद्रीय मंत्र्यांची टीका
रिटेल लोनमध्ये 13 टक्क्यांची तेजी
वार्षिक आधारावर रिटेल लोनमध्ये 13 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तिमाहीच्या आधारावर यामध्ये 6 टक्क्यांची तेजी आली आहे. ऑटो लोन प्री कोविड स्तरावर पोहोचला आहे. लॉकडाऊनपासून दिलासा मिळाल्यानंतर दर महिन्याला कर्ज देण्याची प्रक्रियेने वेग घेतला आहे.