तेजस्वी यादव यांना 'कॅबिनेट'चे स्पेलिंगही सांगता नाही, केंद्रीय मंत्र्यांची टीका

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

काँग्रेस-आरजेडी महाआघाडीचे लोक गप्पू आणि पप्पू आहेत. ते केवल लप्पू म्हणजे खोटी आश्वासने देतील. नागरिकांनी अशा आश्वासनांपासून सावध राहिले पाहिजे.

पाटणा Bihar Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत आहे. आता भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी महाआघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तेजस्वी यादव यांना कॅबिनेटचे अचूक स्पेलिंगही सांगता येणार नाही, अशा शब्दांत टोला लगावला आहे. 

अश्विनी चौबे म्हणाले की, ज्या व्यक्तीला मुद्दे समजू शकत नाही आणि दहावी परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकला नाही, तो इंजिनिअर नितीश कुमार यांच्यावर टीका करत आहे. तेजस्वी कॅबिनेटचे स्पेलिंगही लिहू शकत नाही. त्यांच्या वडिलांनीही अशाच पद्धतीने पहिल्या कॅबिनेटमध्ये एक लाख नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यांनी जनतेकडून पैसे घेतले आणि नोकरीचे अर्ज अजूनही कचरा कुंडीत पडले आहेत. 

हेही वाचा- Video :PM मोदी सी प्लेन सेवेचे पहिले प्रवासी; केवडीया ते अहमदाबाद केला प्रवास 

जनतेला सावध राहण्याचा सल्ला देताना चौबे म्हणाले की, काँग्रेस-आरजेडी महाआघाडीचे लोक गप्पू आणि पप्पू आहेत. ते केवल लप्पू म्हणजे खोटी आश्वासने देतील. नागरिकांनी अशा आश्वासनांपासून सावध राहिले पाहिजे. यावेळी त्यांनी बिहारमधील नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याच्या आश्वासनाचाही उल्लेख केला. 

हेही वाचा- कशासाठी मागायची माफी? शशी थरुरांचा 'पुलवामा'वरुन भाजपला संतप्त सवाल

दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तेजस्वी यांच्या शिक्षणावरुन त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर पलटवार करताना तेजस्वी यांनी नितीश यांना बेरोजगारी आणि स्थलांतराच्या मुद्द्यावर बोलण्याचे आव्हान दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election 2020 tejashwi yadav cant even spell cabinet says central minister ashwini choubey