'अल्लाउद्दीनचा दिवा' म्हणून घातला गंडा; डॉक्टरच्या तक्रारीनंतर पोलिसही बुचकळ्यात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

आजकाल काय घडेल याचा काही नेम नाही.

मेरठ : आजकाल काय घडेल याचा काही नेम नाही. फसवणुकीचे अनेक फंडे बदलत्या जमान्यात बदललेले दिसतात. मात्र, लोक कशाला फसतील याचा आपणही काही अंदाज बांधू शकत नाही. सुशिक्षित म्हणवले जाणारे उच्चशिक्षित लोकदेखील या फसवणुकीला बळी पडताना दिसतायत. मेरठमध्ये डोक्याला हात मारुन घ्यावी अशी एक विचित्र फसवणुकीची घटना समोर आली आहे. काही बदमाश लोकांना एका शिकल्यासवरलेल्या डॉक्टरला अल्लाउद्दीनचा दिवा विकला आहे. इतकंच नव्हे तर या डॉक्टरला विश्वास बसावा म्हणून तो दिवा घासून जिनला देखील बोलावून घेतलं. नंतर लक्षात आलं की हा साराच फसवणुकीचा मामला आहे.

हेही वाचा - Bihar Election : प्रचारात उतरल्या ऐश्वर्या राय; जेडीयूला समर्थन देत वडीलांसाठी केला प्रचार

पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टर एलए खान यांच्या तक्रारीनंतर फसवणूक करणाऱ्या इकरामुद्दीन आणि अनीस यांना अटक केली आहे. डॉक्टर एलए खान यांनी 25 ऑक्टोबर रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी यावेळी सविस्तरपणे सांगितलं की कशाप्रकारे त्यांना या जाळ्यात अडकवलं गेलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोघांनी त्या अल्लाउद्दीनच्या दिव्याला घासलं तेंव्हा अचानक एक जिनदेखील प्रकट झाला. या जिनने अरबी कथेप्रमाणेच पोशाख घातला होता. मात्र, नंतर डॉक्टरांना हे माहित झालं की आपली फसवणूक झालीय आणि त्यांच्यासमोर आलेला व्यक्ती कुणीही जिन वगैरै नव्हता. 

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ते पहिल्यांदा त्या युवकांना आपल्या आजारी आईच्या उपचारासाठी भेटले होते. यानंतर डॉक्टर सतत त्यांच्या घरी उपचारासाठी जात राहीले. हा प्रकार जवळपास एक महिने चालत राहीला. त्या युवकांनी त्यांना सांगितलं की ते एका बाबांना ओळखतात, जे नेहमी त्यांच्या घरी येतात. त्या युवकांनी त्यांना आपल्या बोलण्यात अडकवून त्या तांत्रिक बाबाला भेटण्यास राजी केले. 

हेही वाचा - पुलवामा हल्ल्याचं विरोधकांनी घाणेरडं राजकारणं केलं; PM मोदींनी व्यक्त केलं दु:ख

1.5 कोटींना विकणार होते दिवा
त्यानंतर त्या युवकांनी सांगितलं की, त्यांच्याकडे एक जादूचा दिवा आहे. हा दिवा ते 1.5 कोटींना विकणार होते. यासाठी त्या डॉक्टरांनी त्यांना 31 लाख रुपये डाऊन पेमेंट म्हणून दिले होते. त्या युवकांनी असा दावा केला की हा दिवा त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणेल. या दिव्याला अल्लाउद्दीनचा दिवा असं सांगत त्यांना विकला गेला. एकदा तर त्या युवकांनी त्यांच्यासमोर दिवा घासून जिनला देखील हजर केलं. मात्र, नंतर त्यांच्या लक्षात आलं की, हा हजर झालेला जिन कुणी चमत्कारीक व्यक्ती नव्हता तर त्याचा वेश परिधान करुन आलेला कुणीतरी व्यक्ती होता. 

अन्य काही लोकांनाही फसवले
या तक्रारीनंतर पोलिसांनी या कथित जादूच्या दिव्यासह त्या दोन आरोपींना पकडलं. मेरठचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अमित राय यांनी म्हटलं की, तपासात समजलं की आरोपींनी याचप्रकारे अन्य काही लोकांना फसवलं आहे. तंत्रविद्येच्या नावावर अनेक कुंटुंबाना फसवलं आहे. पोलिस या प्रकरणी सध्या एका महिलेलाही शोधत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thugs tricked meeruts doctor sold aladdins lamp for 31 lakhs