esakal | ICICI बँकेने श्रीलंकेला ठोकला रामराम; सगळे व्यवहार केले बंद
sakal

बोलून बातमी शोधा

icici bank

आयसीआयसीआय बँकेच्या अगोदर दोन भारतीय बँकांनी श्रीलंकेतील आपला व्यवसाय बंद केला आहे.

ICICI बँकेने श्रीलंकेला ठोकला रामराम; सगळे व्यवहार केले बंद

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

कोलंबो- भारताची खाजगी क्षेत्रातील मोठी आणि प्रसिध्द बॅंक आईसीआईसीआई बैंकने (ICICI Bank) श्रीलंकेतील आपला सगळा व्यवसाय आणि सेवा बंद केली आहे. यापूर्वी हा व्यवसाय बंद करण्यासाठी बँकेला श्रीलंकेच्या आर्थिक प्राधिकरणाकडून  (Monetary Authority) मंजुरी मिळाली होती. बँकेने कामकाज बंद करून परवाने रद्द करण्याची विनंती मान्य केली आहे, असे सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने (The Monetary Board of the Central Bank) अधिकृतपणे सांगितले आहे. याबद्दलची माहिती ICICI Bankने भारतातील भांडवली बाजाराला दिली आहे.

23 ऑक्टोबरपासून बँकेचा परवाना रद्द -
आयसीआयसीआय बँकेने एका नियामक फाइलमध्ये म्हटले आहे की, बँक देखरेख संचालकांनी (Director of Bank Supervision) घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करून बँक समाधानी आहे. श्रीलंकेत व्यवसाय करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेला दिलेला परवाना 23 ऑक्टोबर 2020 च्या अखेरीस रद्द करण्यात आला आहे. यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये आणखी दोन भारतीय बँकांनी श्रीलंकेतील आपला व्यवसाय बंद केला होता.

Corona Impact: भारतातील लक्झरी कारचा व्यवसाय 5 ते 7 वर्षांनी मागे, 'Audi'चा अंदाज

जानेवारी 2020मध्येच ऍक्सिस बँक बंद-
आयसीआयसीआय बँकेच्या अगोदर दोन भारतीय बँकांनी श्रीलंकेतील आपला व्यवसाय बंद केला आहे. श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने ऍक्सिस बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेला श्रीलंकेतील कामकाज बंद करण्याची परवानगी दिली होती. दोन्ही बँकांच्या विनंतीनुसार श्रीलंका सरकारने ही परवानगी दिली.

कोरोनाकाळात Mutual Fundमध्ये गुंतवणूक कुठे आणि कशी कराल?

कामकाज पूर्ण झाल्यानंतर बँकांना दिलेले परवाने रद्द केले जातील. श्रीलंकेत दोन्ही बँका आता आपले कामकाज चालू ठेवू शकत नाहीत. ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कामकाज बंद करण्याच्या परवानगीनंतर लोकांचे पैसे जमा करू शकत नाही. आता या दोन्ही बॅंकांना आपला व्यवसाय बंद करावा लागेल.

(edited by- pramod sarawale)