esakal | 'जपानला मागे टाकत 2050 पर्यंत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होणार'
sakal

बोलून बातमी शोधा

world economy main.jpg

भारत 2030 पर्यंत अमेरिका, चीन, जपाननंतर चौथी मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि नंतर 2050 मध्ये जपानलाही मागे टाकेल. भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात पाचव्या स्थानावर आहे.

'जपानला मागे टाकत 2050 पर्यंत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होणार'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- भारतीय अर्थव्यवस्था 2050 पर्यंत चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. मेडिकल जर्नल लँसेटमध्ये प्रकाशित एका अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था सन 2100 पर्यंत या स्थानावर कायम राहील. 2017 मध्ये भारत जगातल सातवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. लँसेटने 2017 हे आधार वर्ष मानून म्हटले आहे की, भारत 2030 पर्यंत अमेरिका, चीन, जपाननंतर चौथी मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि नंतर 2050 मध्ये जपानलाही मागे टाकेल. भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात पाचव्या स्थानावर आहे. भारताच्या मागे फ्रान्स आणि ब्रिटन आहे.

भारत 2047 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असे नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले होते. परंतु, कोरोना विषाणूमुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे अंदाज थोड्याप्रमाणात चुकले आहेत. 

हेही वाचा- 'त्यांच्यासाठी दलित, मुस्लिम आणि आदिवासी मनुष्य नाहीत'; राहुल गांधींची योगींवर टीका

कोरोनाच्या संकटापूर्वी जपान सेंटर फॉर इकॉनॉमी रिसर्चने मागील वर्षी डिसेंबरमध्ये केलेल्या एका अभ्यासात म्हटले होते की, भारत 2029 पर्यंत जपानला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. 2025 मध्ये 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी भारत सरकारने आपले महत्त्वकांक्षी लक्ष्यही निर्धारित केले आहे.