"देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी १२ वर्षे लागतील"

कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.
RBI
RBI Sakal

नवी दिल्ली : कोरोना महामारीने संपूर्ण जगासह भारताची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. रूळावरून घसरलेली ही अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी 12 वर्षे लागतील, असा अहवाल केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या संशोधन पथकाने दिला असून, कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे. (RBI Report On Indian Economy)

RBI
हिंदू ओवैसींना शिवसेनेविरोधात उतरवले जातयं, संजय राऊतांची भाजपवर टीका

अहवालानुसार, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे आर्थिक गतीला चालना देण्याचा वेगही मंदावला आहे. युद्धामुळे वस्तूंच्या किमती वाढणे, जागतिक आर्थिक दृष्टीकोन कमकुवत होणे आणि गंभीर जागतिक आर्थिक परिस्थिती यामुळेही अडचणी निर्माण झाल्या असल्याचे म्हटले आहे. RBI च्या 2021-22 या आर्थिक वर्षातील चलन आणि वित्तविषयक अहवालात असेही म्हटले आहे की, चलन आणि वित्तीय धोरणामध्ये नियतकालिक समतोल राखणे हे स्थिर वाढीच्या दिशेने पहिले पाऊल असावे. मात्र, हा अहवाल कुणा एकाचे मत नसून ज्या व्यक्तींनी हा अहवाल तयार केला त्यांचे हे मते असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय बँकेने दिले आहे.

RBI
MPSC परिक्षेचा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यात पहिला

या अहवालात अनेक संरचनात्मक सुधारणा सुचवण्यात आल्या असून, यामध्ये कमी किमतीच्या जमिनीचा दावामुक्तीचा वापर वाढवणे, शिक्षण आणि आरोग्यावर सार्वजनिक खर्च वाढवणे आणि स्किल इंडिया मिशनद्वारे कामगारांची गुणवत्ता सुधारणा अशा प्रकारच्या अनेक सूचनांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com