अमेरिकेत कोरोनाचा कहर! कोरोनाबाधितांची संख्या वाचून तुम्हालाली वाटेल भीती

Donald Trump
Donald Trump

वॉशिंग्टन- अमेरिकेतील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भयंकर बनत चाललं आहे. covid-19 मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 12 हजारांच्या पुढे गेली आहे. जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीने याबाबतची आकडेवारी दिली आहे. कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या पाहता अमेरिका कोरोना महामारीपुढे हतबल झाल्याचं दिसत आहे. जगातील सर्वाधिक बाधित देश अमेरिका ठरला आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने अमेरिकेत येत्या काळात आणीबाणी सदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

जगातील सर्वाधिक मृतांची नोंद अमेरिकेत झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1,15,130 लोकांनी या विषाणूमुळे जीव सोडला आहे. तर 20,66,401 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत मृतांचा आकडा दररोज दोन हजारांचा पुढे नोंदला गेला आहे. जगातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता एकट्या अमेरिकेत एक तृतीयांश रुग्ण संख्या आहे. ही आकडेवारी भीतीदायक आहे. 

अमेरिकेत कोरोना महामारीचा उद्रेक होत असताना देश आणखी एका संकटाला तोंड देत आहे. आफ्रिकन-अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येमुळे हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांकडून सामाजिक अंतराचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे येत्या काळात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील आढवड्यात प्रचारसभा घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे हे संकट अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. 

जागतिक स्तरावर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या जगभरात 73,62,561 कोरोनाबाधित आहेत. तसेच आजपर्यंत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 लाख 14 हजार 566 इतकी झाली आहे. त्यामुळे जगभरात कोरोना विषाणू महामारीने थैमान घातल्याचं दिसत आहे. भारतातही कोरोनाबाधित रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात दहा हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे देशात एकूण 2 लाख 83 हजार 546 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. तसेच आतापर्यंत 7,980 बळी कोरोनाने घेतले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com