
जगात कोरोना महामारीच्या संकटातही सुरक्षित असणाऱ्या(world safest country in covid-19) देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
नवी दिल्ली- कोरोना विषाणू महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. असा क्वचितच एखादा देश असले जेथे हा विषाणू पोहोचला नाही. आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला तर कोरोना विषाणूने पुरते बेजार करुन सोडले आहे. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असण्यामध्ये भारताचा सहावा क्रमांक लागतो. तसेच भारतात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याने हा क्रमांक आणखी वरती जाऊ शकतो. यावेळी जगात कोरोना महामारीच्या संकटातही सुरक्षित असणाऱ्या(world safest country in covid-19) देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
सावधान! कोविड-19 मुळे जागतिक अन्न आणीबाणी उद्भवेल, UN चा इशारा
डीप नॉलेज ग्रुपने कोरोना विषाणूच्या महामारीत सुद्धा कोणते देश सुरक्षित असतील याबाबत अभ्यास केला होता. यात त्यांनी 200 देशांचा अभ्यास केला होता. यात कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशांनी कोणते प्रयत्न केले, प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणते निर्णय घेतले, तसेच त्या देशाची अर्थव्यवस्था या बाबींचा विचार करुन एक अहवाल तयार करण्यात आला होता. तसेच सुरक्षिततेनुसार देशांची चार श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली होती. त्यातील पहिल्या श्रेणीत सर्वाधिक सुरक्षित अशा 20 देशांचा समावेश करण्यात आला.
USA Election : कोरोनाच्या संकटातही ट्रम्प यांना प्रचारसभेची घाई; ट्रम्प काय म्हणाले पाहा
कोरोनाच्या संकटातही सर्वाधिक सुरक्षित देश स्वित्झर्लंड ठरला आहे. तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीमध्ये अनुक्रमे असुरक्षित आणि अत्यंत असुरक्षित देशांना स्थान देण्यात आले आहे. भारत तिसऱ्या श्रेणीत असून कोरोना विषाणूच्या संकटात असुरक्षित देश ठरला आहे. भारताला या यादीत 56 वा क्रमांक मिळाला आहे. 200 देशांच्या यादीत सुदान हा देश सर्वात असुरक्षित ठरला आहे.
धक्कादायकच! इटली म्हणतेय,'कोरोनामुळे भाषेवर होतंय नकोसं आक्रमण'
एकमेव आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचा समावेश असुरक्षित देशांमध्ये करण्यात आला आहे. अमेरिका या यादीत 58 व्या स्थानी आहे. पाकिस्तान या यादीत 148 व्या स्थानावर आहे. ज्या देशातून कोरोनाचा प्रसार झाला, त्या चीनचा समावेश दहा सर्वाधिक सुरक्षित देशांमध्ये करण्यात आला आहे.
सॅटेलाइट फोटोंमधून कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर, चीनमध्ये काय घडलं?
जगातील सर्वात सुरक्षित 10 देश
स्वित्झर्लंड, जर्मनी, इज्राईल, सिंगापूर, जपान, ऑस्ट्रिया, चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया
..अन् चीनच्या लढाऊ विमानांवर आली पळ काढण्याची वेळ
स्वित्झर्लंड आणि जर्मनी या देशांनी सार्वजनिक आरोग्यावर अधिक लक्ष दिलं होतं. तसेच या देशांमध्ये टाळेबंदी योग्य पद्धतीने राबवण्यात आली. तसेच अर्थव्यवस्थेला फारसा धक्का बसणार नाही असे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे या देशांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवले असे अहवालात म्हणण्यात आलं आहे.