esakal | अर्थ मंत्रालयाच्या अहवालामुळे वाढलं टेन्शन, कोरोनाचा फटका बसणार
sakal

बोलून बातमी शोधा

money

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यस्थेवर मोठा ताण आला आहे. आता केंद्र सरकारकडूनही ही बाब मान्य करण्यात आली आहे की कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर बिघडेल.

अर्थ मंत्रालयाच्या अहवालामुळे वाढलं टेन्शन, कोरोनाचा फटका बसणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यस्थेवर मोठा ताण आला आहे. आता केंद्र सरकारकडूनही ही बाब मान्य करण्यात आली आहे की कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर बिघडेल. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार चालु आर्थिक वर्षात जीडीपी कॉन्ट्रॅक्शन 4.5 टक्क्यांच्या जवळपास असेल. 

देशाचा जीडीपी 200 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. या जीडीपीमध्ये 4.5 टक्के घट होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशाचा जीडीपी जवळपास 203 लाख कोटी रुपये इतका आहे. एप्रिल 2020 मध्ये जीडीपीबद्दल अंदाज व्यक्त कऱण्यात आला होता. त्यापेक्षा हा अंदाज 6.4 टक्क्यांनी कमी आहे.एप्रिलपर्यंत सरकारला अपेक्षा होती की जीडीपी 1.9 टक्क्यांपर्यंत असेल. 

हे वाचा - कोरोनाचा 70 स्टार्टअपला फटका, 12 टक्के उद्योग बंद करण्याची नामुष्की

याआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जून महिन्यात वर्ल्ड इकॉनॉनिक आऊटलूक प्रसिद्ध केलं होतं. त्यात म्हटलं होतं की, जागतिक अर्थव्यवस्थेत 2020 मध्ये 4.9 टक्क्यांची घट होईल. एप्रिलमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे 1.9 टक्के जास्त आहे. एप्रिल 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अंदाज व्यक्त केला होता की जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 3 टक्क्यांनी घसरण होईल.

रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, 2020 मध्ये जगातील अनेक देशांमध्ये जीडीपीमध्ये घसरण होईल. अॅडव्हान्स इकॉनॉमीमध्ये ही घसरण 8 टक्क्यांपर्यंत असू शकते. एप्रिलच्या तुलनेत ही 1.9 टक्के जास्त आहे. इमर्जिंग इकॉनॉमीसाठी हाच घसरणीचा अंदाज उणे 3 टक्के इतका ठेवण्यात आला होता. भारत याच कॅटेगरीत येतो. अर्थमंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार घसरणीचा अंदाज त्यापेक्षा 1.5 टक्क्यांनी जास्त आहे. 

हे वाचा - मोदींच्या या 3 अपयशांचा हार्वर्ड स्कूलमध्ये अभ्यास होईल; राहुल गांधींचा टोला

एनएसओने दिलेल्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये भारताचा विकास दर 4.2 टक्के इतका राहिला आहे. तर गेल्या अर्थिक वर्षात 2018-19 मध्ये विकास दर 6.1 टक्के इतका राहिला होता. 

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या सात लाख्यांच्या वर पोहोचली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात 26 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलं होतं. तेव्हा पासून आतापर्यंत हळूहळू लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसायांना फटका बसला असून नोकऱ्यांमध्येही कपात कऱण्यात आली आहे. याचा फटका अर्थव्यवस्थेलाही बसत आहे. 

loading image