
स्टेट बँकेने नुकत्याच सादर केलेल्या एका अहवालानुसार, भारताचा एकूण देशांतर्गत उत्पादनाचा दर (जीडीपी) आर्थिक वर्ष शून्य ते उणे 6.8 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - कोरोना संकटाचा सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर चालू आर्थिक वर्षात गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेने नुकत्याच सादर केलेल्या एका अहवालानुसार, भारताचा एकूण देशांतर्गत उत्पादनाचा दर (जीडीपी) आर्थिक वर्ष शून्य ते उणे 6.8 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे सरलेल्या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीचा जीडीपीचा दर 1.2 टक्के असण्याची शक्यता आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2019-20 च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) विकासदर सात वर्षातील नीचांकी पातळीवर म्हणजे 4.7 टक्क्यांवर पोचला होता. तर पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीतील विकासदर अनुक्रमे 5.1 टक्के आणि 5.6 टक्के राहिला होता. चौथ्या तिमाहीतील अखेरच्या आठवड्यात लॉकडाऊनमुळे पूर्ण व्यवसाय आणि उद्योगांचे कामकाज ठप्प झाले होते. यामुळे जानेवारी ते मार्च तिमाहीत विकासदर 1.2 टक्के राहण्याची शक्यता आहे.
भारतीय सहकारी बँकांना लक्ष्य करते आहे अॅडविंड जावा रॅटची नवी लाट: सेक्राइट
एका आठवड्यात 1.4 लाख कोटींचा फटका:
मार्च महिन्यात अखेरच्या आठवड्यात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एका आठवड्यात अर्थव्यवस्थेला 1.4 लाख कोटी रुपयांचा फटका बसला होता. तसेच नव्या आर्थिक वर्षाचे सुरुवातीचे दोन महिने लॉकडाऊन सुरूच असल्याने विकासदर शून्य टक्क्यांवर किंवा उणे होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीडीपीचा दर उणे 6.8 टक्के राहण्याची शक्यता आहे. देशातील महत्त्वाची आर्थिक केंद्र कोरोनाच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे उत्पादनाला आणखी खीळ बसली आहे.
स्वच्छ, हरित आणि शाश्वत समाज निर्माण करण्याची संधी
भारतीय अर्थव्यवस्था भीषण मंदीतून मार्गक्रमण करणार: क्रिसिल
भारतीय अर्थव्यवस्थेला आतापर्यंतच्या भीषण मंदीचा सामना करावा लागेल, असा अंदाज जागतिक पतमानांकन संस्था क्रिसिलने वर्तविला आहे.
स्वातंत्र्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था चौथ्यांदा मंदीचा सामना करत आहे. वर्ष 1990 मध्ये आर्थिक उदारीकरण झाल्यानंतर पहिल्यांदा अर्थव्यवस्था भीषण परिस्थितीला सामोरे जाते आहे. कोरोना संकट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विकासदर 5 टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक परिणाम पहिल्या तिमाहीत (एप्रिल- जून) बघायला मिळेल. त्यादरम्यान जीडीपी 25 टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. कोरोनापूर्व स्थिती येण्यासाठी किमान 3 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. याआधी वर्ष 1958, 1966 आणि 1980 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने मंदीचा सामना केला होता.