निर्देशांक पुन्हा घसरले; सेन्सेक्स 323 अंश पडला | Indian share market update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

निर्देशांक पुन्हा घसरले; सेन्सेक्स 323 अंश पडला

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : भारतीय शेअर बाजार (Indian share market) निर्देशांकांनी (co-ordinates downfall) काल घेतलेली उसळी अल्पजीवीच ठरली व आज पुन्हा निर्देशांनी घसरण अनुभवली. आज सेन्सेक्स (Sensex) 323.34 अंश तर निफ्टी (Nifty) 88.30 अंश घसरला.

हेही वाचा: अट्टल हल्लेखोरास अटक; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

सकाळी व्यवहार सुरु झाल्यावर बाजारात तेजी आली होती, मात्र शेवटच्या तासात नफावसुली झाली व व्यवहार बंद होताना सेन्सेक्स 58,340.99 अंशांवर तर निफ्टी 17,415.05 अंशांवर बंद झाला. जर्मनीमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येत असल्याच्या वृत्तामुळे बाजारात निराशा पसरली व गुंतवणुकदारांनी विक्री केली. वाहनउद्योग, धातूनिर्मिती, आयटी आदी कंपन्यांच्या शेअरचे भाव घसरले, तर बँकांचे भाव वाढले.

मारुतीचा शेअर 185 रुपयांनी घसरून 7,664 रुपयांवर आला. इन्फोसीस (बंद भाव 1,697 रु.), रिलायन्स इंडस्ट्रीज (2,350), लार्सन अँड टुब्रो (1,860) यांच्याबरोबरच टाटा स्टील, टेक महिंद्र, सन फार्मा, महिंद्र आणि महिंद्र, डॉ. रेड्डीज लॅब, टीसीएस या शेअरचे भाव घसरले. तर दुसरीकडे कोटक बँक पुन्हा दोन हजारांच्या वर जाऊन 2,012 रुपयांवर स्थिरावला. आयसीआयसीआ बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, स्टेटबँक या शेअरचे भाव वाढले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 47,630 रु.

चांदी - 62,700 रु.

loading image
go to top