ऑस्ट्रेलियन विमान कंपनी लवकरच इंडिगोच्या ताब्यात?

वृत्तसंस्था
Friday, 15 May 2020

ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या क्रमांकाची विमान वाहतूक कंपनी 'व्हर्जिन ऑस्ट्रेलिया'ला भारतीय विमान कंपनी इंडिगो खरेदी करण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या व्हर्जिन ऑस्ट्रेलियाने कोरोनाच्या काळात विमान सेवा ठप्प झाल्यानंतर दिवाळखोरी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या क्रमांकाची विमान वाहतूक कंपनी 'व्हर्जिन ऑस्ट्रेलिया'ला भारतीय विमान कंपनी इंडिगो खरेदी करण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या व्हर्जिन ऑस्ट्रेलियाने कोरोनाच्या काळात विमान सेवा ठप्प झाल्यानंतर दिवाळखोरी जाहीर केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिवाळखोरीच्या लिलाव प्रक्रियेत इंडिगोची प्रवर्तक कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन सहभागी होणार आहे.

व्हर्जिन ऑस्ट्रेलियावर 1.4 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलरचे कर्ज आहे. दरम्यान कंपनीला मदत करण्यास ऑस्ट्रेलियन सरकारने असमर्थता दाखविल्यानंतर कंपनीने 21 एप्रिलरोजी दिवाळखोरी जाहीर केली आहे. या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 10 कंपन्यांनी उत्सुकता दाखविली आहे. यामध्ये भारतीय कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनचा सहभाग आहे. 

कररचना बदलली तरच उद्योग...

व्हर्जिन ऑस्ट्रेलियाने दिवाळखोरी जाहीर केल्याने कंपनीच्या 16 हजार कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.

दरम्यान इंडिगो एअरलाईन्समध्ये राहुल भाटिया यांच्या इंटरग्लोब एव्हिएशनची 37.87 टक्के तर राकेश गंगवाल आणि कुटुंबीयांची 36.64 टक्क्यांची भागीदारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indigo in race to buy Australian airlines