इन्फोसिसच्या कोट्यधीश कर्मचाऱ्यांची संख्या वाढून ७४ 

पीटीआय
Wednesday, 3 June 2020

देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमधील कोट्यधीश कर्मचाऱ्यांची संख्या २०१९-२० या आर्थिक वर्षात वाढून ७४ वर पोचली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात इन्फोसिसमधील कोट्यधीश कर्मचाऱ्यांची संख्या ६४ इतकी होती. कंपनीचे कोट्यधीश कर्मचारी उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष पदांवरील आहेत.

देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमधील कोट्यधीश कर्मचाऱ्यांची संख्या २०१९-२० या आर्थिक वर्षात वाढून ७४ वर पोचली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात इन्फोसिसमधील कोट्यधीश कर्मचाऱ्यांची संख्या ६४ इतकी होती. कंपनीचे कोट्यधीश कर्मचारी उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष पदांवरील आहेत. २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१९-२० मध्ये या कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ झाली आहे. यात कंपनीकडून शेअरच्या स्वरुपात मिळालेल्या भत्त्यांचे मोठे मूल्य आहे. इन्फोसिसच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनात निश्चित वेतन, बदलते वेतन, शेअर आणि निवृत्तीनंतरचे लाभ यांचा समावेश आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात या कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी १० टक्क्यांची वाढ म्हणजेच ६.८ लाखांची वाढ झाली आहे. तर त्याआधीच्या वर्षात वेतनातील सरासरी वाढ ६.२ टक्के इतकी होती. कंपनीच्या भारतातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वार्षिक वाढ सरासरी ७.३ टक्के इतकी होती.

आर्थिक नियोजन करताना 'हे' लक्षात घ्या

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख आणि सीओओ यू बी प्रवीण राव यांच्या वेतनाचे एमआरईबरोबरचे गुणोत्तर अनुक्रमे ५०२ ते १५५ इतके आहे. इन्फोसिसमधील इतर वरिष्ठ पदांवरील व्यक्तींचे वेतन मात्र वाढलेले नाही. या कर्मचाऱ्यांना सरलेल्या आर्थिक वर्षात बढतीदेखील मिळालेली नाही. सरलेल्या आर्थिक वर्षात अनेक व्यवस्थापकीय पदावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आलेली नाही.

निफ्टीने ओलांडली १०,००० अंशांची पातळी, सेन्सेक्सही ३४,०००च्या पार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infosys now have 74 crorepati employees