भारतातील 'या' कंपनीला पहिल्या तिमाहीत तब्बल ४२७२ कोटी रुपयांचा नफा

टीम ई सकाळ
Friday, 17 July 2020

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल ४२७२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. 

नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना संपूर्ण जगच लॉकडाऊन झालेले असून अर्थव्यवस्था पूर्णतः ढासलेली आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल ४२७२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

इन्फोसिसच्या नफ्यातील ही वाढ तब्बल १२.४ टक्के आहे. गेल्यावर्षीच्या या काळातील तुलनेतही ही वाढ मोठी आहे. गेल्या वर्षी याच काळात कंपनीने ३८०२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला होता. कंपनीच्या महसुलातही गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ८.५ टक्के वाढ झाली असून, या तिमाहीत कंपनीला २३,६६५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
------------
अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक कायम; एका दिवसात वाढले तब्बल एवढे रुग्ण
------------
भारतीय कंपन्यांत जगासाठी लस करण्याची क्षमता; बिल गेट्स यांचे 'या' कंपन्याविषयी गौरवोद्वार
------------

कोविड-१९मुळे जगभरातील उद्योग क्षेत्रावर विपरित परिणाम झालेला आहे. असे असूनही इन्फोसिसने या तिमाहीत बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी नोंदविली असल्याने समाधान व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infosys Q1 net profit up 12.4 pc to Rs 4272 cr