इन्फोसिसचे शेअर्स तेजीत; नफ्यात झाली 23.5 टक्‍क्‍यांची वाढ!

वृत्तसंस्था
Monday, 13 January 2020

इन्फोसिसने नुकतेच तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 23.5 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

बंगळूर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस कंपनीच्या समभागामध्ये सोमवारी (ता.13) शेअर बाजार सुरु होताच तेजी दिसून आली. कंपनीचा अपेक्षेपेक्षा चांगला लागलेला तिमाही निकाल आणि कंपनीमध्ये गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यांनतर समभागामध्ये तेजी दिसून आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इन्फोसिसच्या समभागाने सोमवारी सकाळच्या सत्रात 4.50 टक्‍क्‍यांची उसळी 777 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. दिवसअखेर इन्फोसिसचा समभाग 35.15 रुपयांनी वधारून 773.40 रुपयांवर व्यवहार करीत स्थिरावला. 

- 'इन्कम टॅक्‍स रिटर्न'मधील महत्त्वाचे बदल वाचले का?

तेजीची कारणे 

इन्फोसिसने नुकतेच तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 23.5 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. कंपनीला तिमाहीत 4 हजार 457 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तसेच, कंपनीने ताळेबंदात फेरबदल केल्याच्या आरोपांची तपासणी लेखापरीक्षण समितीने केली असून, या आरोपात समितीला काही तथ्य आढळून आले नसल्याचे इन्फोसिसने स्पष्ट केले आहे.

- ऑनलाइन व्यवहार करताय? मग 'या' गोष्टींवर लक्ष ठेवा

कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींचा गांभीर्याने विचार करून आणि स्वतंत्र समितीने चौकशी केली. त्यानंतर कोणत्याची प्रकारची अयोग्य कृती कंपनीच्या वरिष्ठांकडून झाली नसल्याचे इन्फोसिसचे लेखापरीक्षण समितीचे अध्यक्ष डी. सुंदरम यांनी म्हटले आहे. 

- शेअर बाजारात "एक गरम चाय की प्याली हो...'

काय होते प्रकरण? 

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख आणि मुख्य वित्तीय अधिकारी निलंजन रॉय यांनी कंपनीच्या आर्थिक ताळेबंदातील आकडेवारी चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी केला होता. त्याची दखल 'सेबी' आणि 'अमेरिकन स्टॉक एक्‍सचेंज कमिशन'ने घेतली होती. त्यानंतर कंपनीनेही स्वतंत्रपणे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infosys share price gains five percentage on guidance revision