Inox Green IPO: आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेजचा आयपीओ आजपासून खुला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inox Green IPO

Inox Green IPO: आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेजचा आयपीओ आजपासून खुला...

आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसचा (IGESL) आयपीओ शुक्रवारी अर्थात आज सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. त्याची किंमत 61-65 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओचे सबस्क्रीप्शन घेण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे. कंपनीने यातून 740 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या अंतर्गत कंपनी 370 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. (Inox Green Energy IPO Open share market )

हेही वाचा: IPO : येत्या आठवड्यात चार कंपन्यांचे ‘आयपीओ’

कंपनीने या आयपीओसाठी 230 शेअर्सचा लॉट आकार निश्चित केला आहे. 75% हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवला आहे. त्याच वेळी, 15% शेअर्स गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्याच वेळी, बाकी 10 टक्के शेअर्स रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवले आहेत.

हेही वाचा: Share Market : 'हे' 3 शेअर्स देतील तगडा परतावा, तज्ज्ञांना विश्वास

आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीची स्थापना 2012 मध्ये झाली. ही भारतातील आघाडीची पवन ऊर्जा ऑपरेटर आणि मेनटेनंन्स (O&M) सर्विस प्रोवायडर आहे. आयनॉक्स विंडची उपकंपनी असलेल्या ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसचा गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये व्यवसाय आहे. आयनॉक्स ही कंपनी जीएफएल ग्रुपचा एक भाग आहे. आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसमध्ये सध्या आयनॉक्स विंडचा 93.84 टक्के हिस्सा आहे.

हेही वाचा: Ashok Leyland Stock : अडीच वर्षात तीन पट वाढ, आता हा स्टॉक आणखी वाढण्याची शक्यता

नवीन आयपीओसाठीची कागदपत्रे कंपनीने 17 जून रोजी दाखल केली होती. त्यानुसार 740 कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये 370 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. तसेच, त्याचे प्रमोटर्स आयनॉक्स विंड 370 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री करतील. आयनॉक्स ग्रीन एनर्जीमध्ये सध्या वार्षिक 30 ते 40 टक्के वाढ दिसत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.