बँका करतायेत व्याजदर कपात

वृत्तसंस्था
Tuesday, 2 June 2020

रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) व्याजदरात कपात केल्यानंतर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी व्याजदर कपातीचा धडाका लावला आहे. आता पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि युनियन बँकेने व्याजदरात कपात केली आहे.

मुंबई - रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) व्याजदरात कपात केल्यानंतर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी व्याजदर कपातीचा धडाका लावला आहे. आता पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि युनियन बँकेने व्याजदरात कपात केली आहे. 

गुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...

पीएनबीने रेपो दराशी संलग्न कर्जदरात (आरएलएलआर) 0.40 टक्क्याची कपात केली आहे. यामुळे नवीन कर्जदर 7.05 टक्क्यांवरून कमी होत 6.65 टक्क्यांवर आला आहे. याचप्रमाणे बँकेने मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) 0.15 टक्के कमी केला आहे. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.

आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा घटक, 'आरोग्य विमा'

युनियन बँकेने देखील रेपो आधारित कर्ज दरामध्ये कपात केली आहे. युनियन बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (ईबीएलआर)मध्ये 0.40 टक्क्याची कपात केली असून नवीन दर 6.80 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. नवे दर 1 जूनपासून लागू झाले.करण्यात आले आहे.

श्रीमंत होत रिटायर होण्यासाठी लक्षात घ्या 'या' टिप्स

आरबीयाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 22 मे रोजी रेपो दरात 0.40 टक्के कपातीची घोषणा केली होती. आता रेपो दर 4 टक्क्यांवर आला आहे. आरबीआयचे द्विमाही पतधोरण 6 जून रोजी पतधोरण जाहीर होणार होते. मात्र त्याआधीच व्याजदर कपात करून बँकेने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interest rate cut down by banks continues