'हा' मल्टीबॅगर स्टॉक फक्त एका महिन्यात 40% वाढला, आणखी तेजी येण्याची शक्यता

पूनावाला फिनकॉर्पच्या शेअर्समध्ये (Poonawalla Fincorp) गेल्या काही दिवसात सतत वाढ दिसून येत आहे.
Share Market
Share Market Sakal

Share Market: पूनावाला फिनकॉर्पच्या शेअर्समध्ये (Poonawalla Fincorp) गेल्या काही दिवसात सतत वाढ दिसून येत आहे. बंधवारी तो बीएसईवर 6 टक्क्यांच्या वाढीसह 343 रुपयांवर पोहोचला, जो 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. गेल्या एका महिन्यात, हा मल्टीबॅगर स्टॉक सुमारे 40 टक्क्यांनी वाढला आहे, तर या महिन्यात हा स्टॉक 105 टक्क्यांनी वाढला आहे.

पूनावाला फिनकॉर्पचे (Poonawalla Fincorp) जुने नाव मॅग्मा फिनकॉर्प (Magma Fincorp) आहे. ही पूनावाला समूहाची नॉन-बँकिंग वित्तीय (NBFC) कंपनी आहे. कंपनीचे लक्ष ग्राहक आणि एमएसएमई वित्तपुरवठा यावर आहे.

Share Market
ब्रोकरेजने सिमेंट सेक्टरमधला हा शेअर करेल दमदार कामगिरी; तज्ज्ञांना विश्वास

आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा वाढीचा प्रवास सुरू राहिला आहे. या कालावधीत, कंपनीच्या AUM मध्ये वार्षिक आधारावर 17 टक्के वाढ झाली आहे. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत, कंपनीचा AUM वार्षिक आधारावर 17 टक्क्यांनी वाढून 16,575 कोटी झाला आहे, तर AUM तिमाही आधारावर 9 टक्क्यांनी वाढल्याचे कंपनीने सांगितले.

हाऊसिंग फायनान्स उपकंपनी पूनावाला हाउसिंग फायनान्सच्या एयूएमने 5,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचेही त्यांनी सांगितले.

Share Market
यावर्षी आतापर्यंत 60 टक्के वाढला हा शेअर, तुमच्याकडे आहे का?

आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत तिच्या सर्व उत्पादनांच्या वितरणात चांगली वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीचे डिस्बर्समेंट (कर्ज वितरण) आर्थिक वर्ष 2022 मध्ये 9,490 कोटी रुपयांच्या तुलनेत सुमारे 3,330 कोटी रुपये होते. आगामी तिमाहीतही ही वाढ सुरू राहण्याची अपेक्षा असल्याचे कंपनीने सांगितले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com