esakal | म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक २८.२९ लाख कोटी रुपयांवर
sakal

बोलून बातमी शोधा

investment

देशातील म्युच्युअल फंडांकडील एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) फेब्रुवारीअखेर २८.२९ लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. 

म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक २८.२९ लाख कोटी रुपयांवर

sakal_logo
By
पीटीआय

मुंबई  - देशातील म्युच्युअल फंडांकडील एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) फेब्रुवारीअखेर २८.२९ लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘ॲम्फी’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’च्या (एसआयपी) माध्यमातून फेब्रुवारी महिन्यात गुंतवणूकदारांनी ८ हजार ५१३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंड योजनांमधील एकूण गुंतवणुकीमध्ये वार्षिक १५ टक्के वाढ झाली आहे. फेब्रुवारीत इक्विटी फंड योजनांमध्ये १० हजार ९७६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ही मार्च २०१९ नंतरची सर्वाधिक वाढ आहे.

स्टेट बँकेत अकाउंट आहे? तर हे वाचाच!

लार्ज कॅप, मल्टी कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप प्रकारातील म्युच्युअल फंडांमध्ये १ हजार ४०० कोटी ते १ हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. फेब्रुवारीमध्ये सेक्‍टोरल आणि थिमॅटिक प्रकारातील फंडांमध्ये १ हजार ९२८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

गोल्ड एक्‍स्चेंज ट्रेडेड फंडांमध्ये (ईटीएफ) सुमारे सातपटीने वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये २०२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. ही गुंतवणूक फेब्रुवारीमध्ये १ हजार ४८३ कोटी रुपयांवर पोचली आहे.