९७ कंपन्या IPO तून २.२५ कोटी गोळा करणार; गुंतवणुकीसाठी मोठी संधी

आतापर्यंत बाजार नियामक सेबीने एलआयसीसह इतर ४३ कंपन्यांना आयपीओसाठी मंजुरी दिली तर आणखी ५४ कंपन्याना मंजुरी देणार असल्याचे बोलले जात आहे.
IPO
IPOSakal media

येत्या वर्षात आयपीओ(IPO)ची बाजारात दमदार कमाई करणार असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी सुद्धा आयपीओने दमदार कामगिरी करत आपली छाप सोडली होती. यावर्षीही त्याच जोशात तब्बल ९७ कंपन्या आयपीओच्या माध्यमातून २.२५ कोटी गोळा करणार आहे.त्यामुळे गुंतवणूकीसाठी ही मोठी संधी म्हणता येणार. (Investment opportunities As 97 companies are set to raise Rs 2.25 lakh crore through IPOs in the next financial year

IPO
2022 मध्ये सरासरी पगारात 8 ते 12 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

आतापर्यंत बाजार नियामक सेबीने एलआयसीसह इतर ४३ कंपन्यांना आयपीओसाठी मंजुरी दिली तर आणखी ५४ कंपन्याना मंजुरी देणार असल्याचे बोलले जात आहे.या प्रतिक्षेत असलेल्या ५४ कंपन्या एकूण १.४० लाख कोटी रुपये गोळा करणार तर ज्या ४३ कंपन्याना बाजार नियामक सेबीने मंजुरी दिली आहे त्या ८१ हजार कोटी रुपये गोळा करणार.

IPO
आता आधारशी लिंक होणार 'हे' दोन प्रमाणपत्र; जाणून घ्या सरकारची योजना

सध्याची परिस्थिती पाहता रशिया-युक्रेन युद्ध संकटाचा मोठा परिणाम शेअर बाजारावर झालाय.त्यामुळे या कंपन्या वाढती महागाई, व्याजदर वाढण्याचा परिणाम आणि शेअर बाजारात सुरु असलेली चढउतार शांत होण्याची वाट पाहत आहे. शेअर बाजाराची स्थिती निवळल्यानंतर हे आयपीओ सादर करण्यात येणार. आयपीओ सादर केल्याने कंपन्यांना आपले उत्पादन विस्तारण्याची मोठी संधी मिळत असते.

IPO
चेक पेमेंटमध्ये फसवणूक टाळण्यासाठी PNB चे नवीन नियम; जाणून घ्या

कंपनी आयपीओ आकार (कोटी रुपयांत) खालीप्रमाणे

एलआयसी - ६५,०००,

ओयो रुम्स - ८,४३०

डेलिव्हरी - ७,४६०

एपीआय होल्डिंग्स - ६,२५०

भारत एफआयएच - ५,००३

एमक्यूअर फार्मा - ४,०००

गो एअरलाइन्स - ३,६००

फाइव्ह स्टार फायनान्स - २,७५२

जेमिनी इडिबल्स - २,५००

पारादीप फॉस्फेट्स - २,२०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com