FD Investment : टेन्शन न घेता मालामाल होण्याची संधी! FD वर भक्कम व्याज देणाऱ्या सरकारी बँका

भविष्यकाळासाठी अनेकजण अगदी पहिल्या पगारापासून विविध पद्धतीने गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात.
Bank FD Rate
Bank FD Ratesakal

FD Investment : आज लोकांच्या हातात पैसा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे भविष्यकाळासाठी अनेकजण अगदी पहिल्या पगारापासून विविध पद्धतीने गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. मात्र, अनेकांचा कोणत्याही टेन्शनशिवाय गुंतवणूक करण्याकडे भर असतो.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

Bank FD Rate
Swasthyam 2022 : ‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त?ध्यान, प्राणायाम व योगसाधनेविषयी जाणून घ्या सगळं

काही जण कर टॅक्स वाचवण्यासाठी बँकामध्ये गुंतवणूक करतात. यासाठी टॅक्स सेविंग एफडी उत्तम पर्याय आहे. यामध्ये किमान पाच वर्षांचा लॉकिंग पिरीएड असतो. आज आम्ही तुम्हाला या लेखात टॅक्स सेविंग एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या पाच सरकारी बँक संदर्भात माहिती देणार आहोत.

Bank FD Rate
Swasthyam 2022 : मानसिक फिटनेस योगाच्या माध्यमातून कसा साधला जाऊ शकतो?

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियात जर तुम्ही टॅक्स सेविंग एफडी करण्याच्या विचारात असाल तर, बँकेकडून पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर 6.25 टक्के व्याज दिले जात आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज देण्यात येत आहे.

यूनियन बँक ऑफ इंडिया

यूनियन बँकेत पाच वर्षांच्या टॅक्स सेविंग एफडीवर 6.70 टक्के व्याज देण्यात येते. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देण्यात येते.

Bank FD Rate
Investment Planning : फक्त 5000 रुपयांची गुंतवणूक करा अन् बना कोट्यधीश; जाणून घ्या, कसं?

कॅनरा बँक

कॅनरा बँकेकडून पाच वर्षांच्या टॅक्स सेविंग एफडीवर 6.50 टक्के व्याज दिले जाते. तर, गुंतवणूक करणारी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असेल तर, त्यांना एफडीच्या गुंतवणुकीवर 7.00 टक्के व्याज दिले जात आहे.

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करण्याच्या योजना

1) म्युच्युअल फंड: तुम्ही म्युच्युअल फंडात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. तुम्ही SIP द्वारे थोड्या प्रमाणात गुंतवणूक सुरू करू शकता. दीर्घ मुदतीसाठी तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर 12 ते 15% परतावा सहज मिळवू शकता.

2) युनिट लिंक्ड विमा योजना (युलिप): तुम्ही मुलांसाठी युनिट लिंक्ड विमा योजना देखील निवडू शकता. बाजाराचा विचार करता, ULIP चा सरासरी परतावा 12-15% असतो.

Bank FD Rate
SIP Investment : लवकर गुंतवणूक सुरु करा, एसआयपी सर्वोत्तम पर्याय, कसा ते जाणून घ्या....

3) FDs, NSCs आणि PPF: तुम्ही FDs, NSCs आणि PPF सारख्या पारंपारिक योजनांमध्ये मुलांच्या नावावर दीर्घ मुदतीसाठी कोणतीही जोखीम न घेता गुंतवणूक करू शकता.  या गुंतवणुकीतून तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य घडवू शकता.

4) चाइल्ड कॅपिटल गॅरंटी सोल्यूशन: हे युनिट लिंक्ड आणि गॅरंटीड रिटर्न प्लॅनचे संयोजन आहेत. या योजनांमध्ये, गुंतवलेल्या रकमेपैकी 50 ते 60% हमी परताव्याच्या स्वरुपात जाते. गुंतवणुकीचा हाही एक उत्तम मार्ग आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व गोष्टींची खातरजमा करून मगच गुंतवणूक करा. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com