Jet Airways दोन वर्षांनी पुन्हा दिसणार आकाशात; नव्या मॅनेजमेंटची घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 8 December 2020

जेट एअरवेजसाठी नवी मॅनेजमेंट टीम तयार करण्यात आली आहे.

नवी दिल्ली- एप्रिल 2019 मध्ये पूर्णपणे बंद झालेली जेट एअरवेज (Jet Airways) पुढील वर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला हवाई सेवा देण्यासाठी सूरु होणार आहे. दुबईच्या मुरारी लाल जालान आणि लंडन स्थित कलारोक कॅपिटलच्या नेतृत्वातील एका कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली आहे. जेट एअरवेजसाठी नवी मॅनेजमेंट टीम तयार करण्यात आली आहे. या टीमने सोमवारी दोन वर्षांपासून बंद पडलेल्या एअरलाईन्ससाठीच्या नव्या योजनेची घोषणा केली. कर्जाच्या ओझ्यामुळे जेट एअरलाईन्समध्ये कर्मचाऱ्यांना सॅलेरी देण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर 2018 मध्ये जेट एअरवेज बंद करण्यात आली. 

महागाईमुळे उज्ज्वला योजनेकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; दर वाढताच गॅसचे बूकिंग घटले

मॅनेजमेंट टीमने एक निवेदन जारी केले आहे. जेट 2.0 चा उद्देश जेट एअरवेजच्या सर्व मार्गांवर अधिक दक्षता आणि उत्पादकता सुनिश्चित करण्यासोबत उपयुक्त प्रक्रिया आणि प्रणालीद्वारे गतवैभव पुनर्जीवित करण्याचं आहे, असं सांगण्यात आलं आहे. सर्व काही योजनेनुसार झाले आणि वेळेवर एनसीएलटी आणि नियामक मंडळाची मंजूरी मिळाली तर जेट एअरवेज 2021 च्या उन्हाळ्यापर्यंत पुन्हा एकदा आकाशात दिसू शकते, असं टीमने म्हटलं आहे. 

न्यू मॅनेजमेंटनुसार, पहिल्यासारखं दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरु जेट 2.0 चे प्रमुख केंद्र असतील. एअर लाईन टियर 2 आणि टियर 3 शहरांचे एक उप हब बनवून तेथेही उड्डानांचे संचालन करण्यात येईल. जेणेकरुन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. 

२५ रुपयांच्या पेट्रोलसाठी तुम्ही मोजताय ८७ रुपये; याचा कधी विचार केलाय?

एअरलाईन्सच्या नव्या बोर्डाचे सदस्य मनोज नरेंद्र मदनानी म्हणाले की, जेट एअरवेज 25 वर्षांपेक्षा अधिक काळापासून चांगल्या इतिहासासोबत एक ब्रँड म्हणून उभी राहिली आहे. आमचे लक्ष्य आता लवकरात लवकर जेट एअरवेजला हवाई पट्टीवर उतरवण्याचे आहे. आम्ही या ब्रँडला मोठे आणि चांगले करत उत्साहाने पुढे जाण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, कोरोना महामारीने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर जेट एअरवेजची योजना महत्वाची आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jet Airways gears up to take off by the summer