JK Cement : या सिमेंट कंपनीने गुंतवणूकदारांना केले कोट्यधीश, आणखी वाढ अपेक्षित...

सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी जेके लक्ष्मी सिमेंटने गेल्या 20 वर्षांत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
JK Cement
JK Cementsakal

सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी जेके लक्ष्मी सिमेंटने (JK Lakshmi Cement) गेल्या 20 वर्षांत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. केवळ एक लाखाच्या गुंतवणुकीवर त्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

या शेअर्समध्ये शेअर बाजार एक्स्पर्ट्सना आणखी तेजीचा कल दिसत आहे. त्यामुळेच देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणुकीसाठी 745 रुपयांचे टारगेट दिले आहे. जे सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 19 टक्के जास्त आहे.

JK Cement
Zomato: झोमॅटोचे शेअर्स एका दिवसात 14% पेक्षा जास्त वाढले

शुक्रवारी जेके लक्ष्मी सिमेंटचे शेअर्स 626.65 रुपयांवर ट्रेड करत होते. गेल्या सहा महिन्यांत या शेअर्समध्ये 55 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याची मार्केट कॅप 7,373.79 कोटी रुपये आहे. 15 नोव्हेंबर 2002 रोजी जेके लक्ष्मी सिमेंटचे शेअर्स केवळ 6 रुपयांवर होते.

जे आता जवळपास 104 पटीने वाढून 626.65 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजे त्यावेळी यात गुंतवलेले एक लाख आतापर्यंत 1.04 कोटी झाली असती. याने शॉर्ट टर्ममध्येही गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.

JK Cement
Pharma Stock: या स्टॉकमध्ये 4 महिन्यांत 90% वाढ, आणखी तेजीची शक्यता

जेके लक्ष्मी सिमेंटचा सप्टेंबर तिमाहीचा स्टँडअलोन एबीटदा अंदाजानुसार वार्षिक 15 टक्क्यांनी घसरून 139 कोटी रुपयांवर आला. तर विक्री वार्षिक आधारावर फ्लॅट राहिली. तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे खर्चात वर्षभरात 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

JK Cement
Ashok Leyland Stock : अडीच वर्षात तीन पट वाढ, आता हा स्टॉक आणखी वाढण्याची शक्यता

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com